गुहागर, ता. 05 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण विद्यार्थ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव 2025 मध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले. Success of Mandaki-Palvan Agricultural College

या स्पर्धा दिनांक 01 व 02 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथे आयोजित केल्या होत्या. आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव 2025 कार्यक्रमामध्ये कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कु.आदित्य तांबेकर व कु.आकाश परताळे या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. Success of Mandaki-Palvan Agricultural College
या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री बाळासाहेब सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक श्री ज्ञानोबा बोकडे यांचे मार्गदर्शन लाभले. Success of Mandaki-Palvan Agricultural College
