• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 November 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोंथा चक्रीवादळ अखेर भारताच्या किनारपट्टीवर धडकले

by Guhagar News
October 31, 2025
in Old News
305 3
0
Cyclone Montha hit
600
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबईसह कोकणाला यलो अर्लट

गुहागर, ता. 31 : पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ अखेर भारताच्या किनारपट्टीवर धडकले. वादळ जमिनीवर येण्यास सुरुवात झाली असून, पूर्णपणे जमिनीवर येण्यास ३ ते ४ तास लागण्याचा अंदाज आहे. दरम्यान या वादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळण्याची शक्यता असून विदर्भात हवामान विभागाने ऑरेज तर कोकणात यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतितास १०० किमी इतक्या प्रचंड वेगाने वादळ जमिनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे वादळ प्रभावित भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वार्‍याने दाणादाण उडाली आहे. Cyclone Montha hit

आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम दरम्यान समुद्र किनार्‍यावर मोंथा चक्रीवादळ धडकले. वादळाचा धोका लक्षात घेऊन अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. या भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केलेल्या असून, मोंथा चक्रीवादळ जमिनीवर येण्यास सुरूवात झाल्यानंतर प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. मोंथा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आले असून, प्रतितास १०० ते ११० किमी इतक्या वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा अंदाज असून, समुद्रातही उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून, वादळ उतरले तेव्हा वारा आणि पावसाचा जोर वाढला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब आणि घरांचेही नुकसान झाले आहे. Cyclone Montha hit

आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम दरम्यानच्या भूभागावर हे वादळ धडकले आहे. आता हळूहळू ते पुढे सरकत आहे. मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागावरही होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातून हे वादळ पुढे जाणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही चक्रीवादळामुळे पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकणातील मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात त्यामुळे सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Cyclone Montha hit

Tags: Cyclone Montha hitGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share240SendTweet150
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.