विरोधकांच्या भ्रष्ट आरोपांना विश्वासदर्शक ठरावाने केले निरुत्तर
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर तेथील विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ ग्रा.पं. सदस्यांनी त्यांच्या बाजूने कौल देऊन सदस्यांना विश्वासात घेऊनच विकासकामे केल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे विरोधकांनी सरपंच अतुल लांजेकर यांच्यावर केलेल्या भ्रष्ट आरोपांना मूठमाती मिळाल्याचे समोर आले आहे. No-confidence motion on Zombadi Sarpanchs cancelled

झोंबडी ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात घेऊन येथील काही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव गुहागर तहसील कार्यालय यांच्याकडे दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सादर करण्यात आला होता. त्यानुसार काल दि. ६ आँक्टोबर रोजी तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. त्यावेळी तहसीलदारांनी प्रथम सरपंचावर अविश्वास ठरावाच्या प्रस्तावातील विषयावर चर्चा सुरु केली. त्यावेळी सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या सौ. रुकसार हुसैन ममतुले या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने झोंबडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र झाल्या. याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर अर्जातील विषय क्र. १, २, ३ वर सदस्यांचे मत विचारण्यात आले. त्यावेळी उपस्थित सदस्यांनी सरपंचांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सदरचा अर्ज आम्ही सदस्यांनी स्वतः लिहिलेला नाही. गावातील काही ग्रामस्थांनी या अर्जावर आमच्याकडून सह्या करून घेतल्या आहेत, असे स्पष्ट केले. No-confidence motion on Zombadi Sarpanchs cancelled

सरपंचांनी सर्व विकासकामे सदस्यांना विश्वासात घेऊन केली व विकासकामे व खर्ची झाली त्याची आम्हाला पुरेपूर कल्पना असून प्रत्येक मासिक सभेमध्ये आम्हाला विचारून सर्वानुमते ठराव मंजूर करून कामे करण्यात आली असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यामुळे सरपंच लांजेकर यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. यावेळी सूचक म्हणून सौ. मयुरी महेश लांजेकर तर अनुमोदक सौ. प्रणाली प्रदीप पवार यांनी भूमिका बजावली. No-confidence motion on Zombadi Sarpanchs cancelled
यावेळी अविश्वास ठरावाच्याविरोधात सरपंचांच्या बाजूने सौ. प्रणाली प्रदीप पवार, सौ. मयुरी महेश लांजेकर, सौ. जैनब अब्दुलवहिद ममतुले, अतुल अनंत लांजेकर यांनी मतदान केले. यापुढे अतुल अनंत लांजेकर हेच पुन्हा झोंबडी ग्रा.पं.मध्ये सरपंच म्हणून कार्यरत राहणार असल्याचे जाहीर झाले. No-confidence motion on Zombadi Sarpanchs cancelled