• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

by Guhagar News
June 12, 2021
in Old News
16 0
0
मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार जाधव : सर्वांसोबत चर्चा करुन घेतला निर्णय

गुहागर, ता. 12 : मोडकाआगर धरणावरील नवीन पुल वहातूकीस खुला केल्यानंतर आता हा रस्ता पुन्हा 30 जूनपर्यंत बंद रहाणार आहे. जुना पुल मोडून तेथे भराव टाकणे, उर्वरित काँक्रिटीकरण पूर्ण करणे या कामासाठी ठेकेदाराने रस्ता बंद करण्याची मागणी केली होती. आमदार जाधव यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार, पत्रकार आणि कार्यकर्ते यांची चर्चा करुन या मागणीला अनुमोदन दिले.
शनिवारी (ता. 12) आमदार भास्कर जाधव यांनी मोडकाआगर धरणावरील नवीन पुलाची पहाणी केली. अधिकृतरित्या हा पुल वहातूकीस खुला होत असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे आश्र्वासनात दिलेल्या तारखेपूर्वी तीन दिवस पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
याच वेळी जुना पुल तसाच ठेवायचा की तोडायचा याबाबतची चर्चा अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता शेख यांनी जुना पुल तोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. ठेकेदारानेही रस्त्याच्या कामासाठीची 40 टन वजनाही मशिनरीची साततत्याने पुलावरुन वहातूक सुरु होती. तरीही पुलाला काहीही झालेले नाही. परंतू तांत्रिक कारणांमुळे हा पुल कागदोपत्री बंद आहे. आमच्या नियोजनात पुल पाडण्याचे काम पावसाळ्यानंतर करायचे होते. मात्र अधिकाऱ्याचा आग्रह असल्याचे सांगितले. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार यांच्याजवळ चर्चा केली. अखेर पावसाळा असल्याने सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे वहातूक कमी असेल. याच काळात पुल बंद राहीला तर वेगाने काम होवून जाईल. अशी चर्चा होवून मोडकाआगर धरणावरचा जुना पुल पाडण्यासाठी आणि गुहागरच्या रस्त्याचे काम वेगाने होण्यासाठी 30 जूनपर्यंत रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महामार्गाचे अधिकारी याबाबतची सूचना तहसीलदारांना देवून अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी बांधकाम सभापती दिपक कनगुटकर, विनायक जाधव,  शिवसेनेचे गुहागर शहरप्रमुख नीलेश मोरे, युवासेना अधिकारी अमरदिप परचुरे, महामार्गचे उपअभियंता मराठे, लघुपाटबंधारेचे अधिकारी जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.