गुहागर, ता. 06 : महावितरण गुहागर येथे सहाय्यक लेखापाल पदी काम करणारे मिलिंद प्रभाकर पवार यांनी विहित कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. Retirement of Assistant Accountant, Guhagar Mahavitaran
मिलिंद पवार हे २२ नोव्हेंबर १९९४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत निम्नस्तर लिपीक ते सहाय्यक लेखापाल पदावर कार्यरत होते. त्यांनी गुहागर, चिपळूण ग्रामीण, चिपळूण शहर, लांजा, दोडामार्ग या ठिकाणी काम केले. त्यांनी ३० वर्षे १० महिने एवढा कालावधी महावितरण मध्ये सेवा केली. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी व अनेक महावितरणच्या ग्राहकानी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Retirement of Assistant Accountant, Guhagar Mahavitaran

या सत्कार समारंभास उपस्थित महावितरणचे कार्यकारी अभियंता भामरे, गावडे, श्री. कांबळे, उप विभाग गुहागरचे उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, शाखा अभियंता व इतर सर्व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. Retirement of Assistant Accountant, Guhagar Mahavitaran