रत्नागिरी, ता. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग, राजापूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी सर्वसाधारण तर मंडणगड संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरले. Reservation of Panchayat Samiti Chairperson post

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रथम माहिती दिली. त्यानंतर अनन्याच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.आजच्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार सर्वसाधारण मीनल दळवी उपस्थित होते. Reservation of Panchayat Samiti Chairperson post