• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आईनेच बाळाच्या तोंडात बोळा कोंबून केली हत्या

by Guhagar News
September 25, 2025
in Old News
227 2
0
The mother killed the baby
446
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण अलोरे येथील महिला वास्तव्यास होती रत्नागिरीत

रत्नागिरी, ता. 25 : ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील पारसनगर येथे घडली आहे. मातेने आपल्या केवळ एक वर्षाच्या निष्पाप बाळाला क्रूरपणे ठार केले. हुरेन असिफ नाईक (वय १ वर्ष, रा. अलोरे, चिपळूण) असे मृत बाळाचे नाव आहे. शाहीन आसिफ नाईक (३५, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव आहे. शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. The mother killed the baby

Jakhadi Festival in Guhagar

ही दुर्दैवी घटना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारसनगर येथे वास्तव्यास होती. आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला संपवल्याच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. The mother killed the baby

घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे समजते. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय आहे आणि महिला मानसिक रुग्ण आहे किंवा कसे, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली असून या घटनेने रत्नागिरी शहर हादरले आहे. The mother killed the baby

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe mother killed the babyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share178SendTweet112
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.