• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी स्वागत समारंभ

by Guhagar News
September 15, 2025
in Old News
48 1
0
Students welcome at Velneshwar College
95
SHARES
270
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे दिनांक १२ सप्टेंबर रोजी नाना फडणवीस सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. Students welcome at Velneshwar College

Students welcome at Velneshwar College

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर प्राचार्य तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ समिती (CSS) सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ समितीच्या सदस्यांना कार्यक्रमात विशेषतः आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या सखोल ज्ञानाचा आणि व्यावहारिक अनुभवाचा लाभ व्हावा, हा यामागचा हेतू होता. या सदस्यांना दरवर्षी प्रत्येक सेमिस्टरला आमंत्रित करून विभागवार विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व बौद्धिक क्षितिज विस्तारास मोठी मदत होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा लघुचित्रफित सादरीकरणही करण्यात आले.  Students welcome at Velneshwar College

Students welcome at Velneshwar College

विद्या प्रसारक मंडळ, ठाणेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “केवळ परीक्षार्थी विद्यार्थी न राहता सजग व सुजाण नागरिक बना.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी दिशा मिळाली. कार्यक्रमात आजी माजी विद्यार्थी  पालकांचे मनोगत हे विशेष आकर्षण ठरले. पालशेत येथील श्री. रवींद्र कानिटकर यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या जेष्ठ शास्त्रज्ञ समिती बद्दल गौरवोद्गार काढले. तसेच यांच्या मुळे त्यांच्या मुलाला मिळालेल्या Placement संबंधी आवर्जून माहिती दिली. समारोपाच्या भागात आभार प्रदर्शनानंतर पसायदान सादर करण्यात आले. अखेरीस स्नेहभोजनाने या उत्साहपूर्ण समारंभाची सांगता झाली. Students welcome at Velneshwar College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStudents welcome at Velneshwar Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.