गुहागर, ता. 08 : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५८ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२५-२६ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी ज्ञानदीप महाविद्यालय मुरवंडे बोरज खेड येथे संपन्न झाली. उत्तर रत्नागिरी झोन ०९ विभागातून एकूण २४ महाविद्यालयांनी विविध कालाप्रकारामध्ये सहभाग नोंदविला. Patpanhale College’s successful journey
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सदर युवा मोहत्सवामध्ये एकूण १३ कलाप्रकारात सहभाग नोंदविला. यापैकी व्यंगचित्र आणि कोलाज या दोन्ही स्पर्धेत ऋषिकेश राजेंद्र नांदलस्कर (द्वितीय वर्ष कला) याने प्रथम क्रमांक पटकाविला. ऑन द स्पॉट पेंटीग स्पर्धेत ऋषिकेश राजेंद्र नांदलस्कर (द्वितीय वर्ष कला) याने द्वितीय क्रमांक मिळविला. शुभम सोनू मांडवकर (तृतीय वर्ष कला) याने पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. वक्तृत्व स्पर्धा गट अ मध्ये कु. नेत्रा प्रसाद पाध्ये (द्वितीय वर्ष वाणिज्य) हीला उत्तेजनार्थ मिळाले. भारतीय समूह गीत व स्कीट गट सी या दोन्ही स्पर्धेत महाविद्यालयास तृतीय क्रमांक मिळाला. वरील स्पर्धेत यश संपादन करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. Patpanhale College’s successful journey

या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, रत्नागिरी येथील कोरिओग्राफ़र मा. श्री. अक्षय पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थानी मिळविलेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. Patpanhale College’s successful journey