श्री विठ्ठल रखुमाई संघ विजेता तर सिया स्पोर्ट्स संघ उपविजेता
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आंबेरे येथील श्री देव नाटेश्वर मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त व गणेशोत्सवानिमित्त भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दिनांक 28 ते 30 ऑगस्ट रोजी खेळविण्यात आल्या. Cricket tournament in Ambere
या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात सिया स्पोर्ट्स डोर्लेकर वाडी संघाने ६ चेंडू २६ धावांचे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई पूर्णगड संघासमोर ठेवण्यात आले होते आणि हे आव्हान स्वीकारून श्री विठ्ठल रखुमाई संघाकडून फलंदाज युगल डोर्लेकर व प्रणव वाघे या जोडीने ५ चेंडू मध्येच २६ धावांचे मोठे आवाहन पार केले आणि श्री देव नाटेश्वर विजय चषकावर श्री विठ्ठल रखुमाई पूर्णगड संघाने आपले नाव कोरले. Cricket tournament in Ambere

या स्पर्धेमध्ये मालिकावीर प्रज्योत आडवीरकर (सिया स्पोर्ट्स), उत्कृष्ट फलंदाज युगल डोर्लेकर ( श्री.विठ्ठल रखुमाई ), उत्कृष्ट गोलंदाज आर्यन डोर्लेकर व ओंकार वाघे ( श्री.विठ्ठल रखुमाई ), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रज्योत आडवीरकर ( सिया स्पोर्ट्स ) शिस्तबद्ध संघ मोमीन स्पोर्ट्स ( गावखडी) उत्कृष्ट समालोचक अर्णव आदेश वासावे यांना गौरविण्यात आले. Cricket tournament in Ambere
बक्षीस वितरण समारंभासाठी व्यासपीठावर श्री. नरेंद्र नाटेकर, श्री.मनोहर नाटेकर, श्री.विलास नाटेकर, श्री. भरत नाटेकर, श्री. अनिल नाटेकर, श्री. वासुदेव नाटेकर, श्री. चंद्रकात नाटेकर, श्री. प्रकाश नाटेकर, श्री. सुनील नाटेकर,दामोदर नाटेकर, दत्ताराम नाटेकर,समर्थ नाटेकर, विनायक नाटेकर, सुदेश नाटेकर, गजानन नाटेकर, अविनाश नाटेकर, संतोष नाटेकर,योगेश नाटेकर, रामचंद्र आंबेरकर, नितेश मुळये, अनंत मुळये आदी. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मुळये, अमोल नाटेकर यांनी केले. या संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य क्रीडा प्रमुख संकेत नाटेकर, निकलेश नाटेकर, निषाद नाटेकर, नरेश नाटेकर,सम्राट नाटेकर, धर्मवीर नाटेकर, मयूर नाटेकर यांनी विशेष मेहनत घेतली. Cricket tournament in Ambere