गुहागर, ता. 06 : तालुक्यातील शृंगारतळी येथील मजलिसे कबूलूल्लाह हुसैनी कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी या सणानिमित्त वेळंब मदरसा ते पालपेणे फाटापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान श्री शृंगारतळी राजा सार्वजनिक गणेशोत्सव बाजारपेठ मंडळाच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी या सणानिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सरबत वाटप करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाल्याने सामाजिक सलोखा व एकता दिसून आली. Procession at Shringartali

शृंगारतळी येथील शृंगारतळीच्या गणपती राजाला यावेळी मजलिसे कबूलूल्लाह हुसैनी कमिटी व मुस्लिम बांधवांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आभार मानले. शेवटी मदरसा वेळंब रोड येथे मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकी दरम्यान गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे व सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. Procession at Shringartali