नगराध्यक्ष राजेश बेंडल : गर्दी टाळून लसीकरणाचा लाभ घ्यावा


गुहागर, ता. 6 : सोमवारी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. १ मधील लसीकरण केंद्रात हा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी शहरातील पात्र नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले आहे. शनिवारी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभागनिहाय लसीकरणाची व्यवस्था नगरपंचायतीने केली होती. सोमवार 7 जून रोजी केवळ शहरातील नागरिकांसाठी आणखी लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. ही कोव्हॅक्सीनची लस केवळ दुसऱ्या डोसासाठी वापरण्यात यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्या गुहागर शहरातील नागरिकालाच हा डोस उपलब्ध आहे. शहरातील किर्तनवाडी रस्त्याकडे जाताना असलेल्या जीवन शिक्षण शाळा क्र. १ मध्ये लसीकरण केंद्र सुरु आहे. तेथेच ही लस घेता येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी सोमवारी 7 जून रोजी सकाळी 8 वाजता लसीकरण केंद्रात उपस्थित रहाणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला टोकन देण्यात येणार आहे. एका व्यक्तीला एकच टोकन देता येईल. केवळ अपंग आणि वयोवृध्द व्यक्तिच्या नातेवाईकाना टोकन देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी गुहागर शहरातील कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी सोमवारच्या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले आहे.
A second dose of covaxin has been made available to the citizens of Guhagar Nagar Panchayat on Monday 7 June 2021. Arrangements have been made to give this dose at the vaccination center. However, eligible citizens of Guhagar should take advantage of this facility. Such an appeal has been made by Mayor Rajesh Bendal.