• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुसळधार पावसाचा गुहागरला मोठा फटका

by Guhagar News
August 20, 2025
in Guhagar
231 3
0
Guhagar is hit hard by torrential rains
455
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

घरे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना

गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. काही मार्गावर कोसळलेली दरड  प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे लगेच बाजूला करण्यात आली. अनेक ठिकाणची भातशेती पाण्याखाली गेली आहे. Guhagar is hit hard by torrential rains

Guhagar is hit hard by torrential rains

सतत धो धो कोसळणाऱ्या पावसाने तालुका वासियांना चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे मौजे जांभारी येथील श्रीम. दर्शना विजय सुर्वे यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे.  बंदरवाडी येथील संतोष नाटेकर यांच्या घराजवळील बांध कोसळून नुकसान झाले आहे. पोमेंडी, गोणवली मुख्य रस्ता ठिकाणी झाड पडले होते. ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला आहे. कोतळूक शिगवणवाडी येथील प्रकाश दत्ताराम शिगवण यांचा गोठा कोसळला असून कोणतीही जिवितहानी नाही. पेवे येथील अ रज्जाक हसन पेवेकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे.   वेलदुर घरातवाडी, जावडेवाडी संभाव्य कोसळणाऱ्या भागाची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे. वेळणेश्वर खारवीवाडी अलीकडे जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या साकवच्या पायऱ्या काल पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने खचल्या आहेत. त्यामुळे साकव रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. पाटपन्हाळे येथील मालती महिपत चव्हाण यांच्या राहत्या घराच्या दोन भिंती पडून  नुकसान झाले आहे. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. आबलोली येथील अंगणवाडी बोध्दवाडी, समाज मंदीरच्या इमारतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. Guhagar is hit hard by torrential rains

Guhagar is hit hard by torrential rains

वरवेली हसलाई देवी मंदिर येथील प्रवासी पिकप शेड पावसामुळे संपूर्ण जमीनदोस्त झाली आहे. यावेळी कोणीही प्रवासी या शेड मध्ये नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. कोळवली, गवाणवाडी येथील पाण्याच्या टाकीवर काल झालेल्या पावसामुळे दरड  कोसळली आहे. तसेच आसपासची झाडे टाकीवर कोसळली आहेत. दरड आणि झाडे बाजूला करण्याचे कामं सुरु होते. आरे पिंपळवट वाकी मार्गे पाटपान्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडून पुर्ण रस्ता बंद झाला होता. वाकी गावातील  ग्रामस्थांनी पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. जामसूद येथील दिपाली दिपक साळवी यांचे घरावर झाड पडले असून पत्र्याचे नुकसान झाले आहे.   ग्रामपंचायत साखरी आगर येथील शशीकांत नाचरे यांच्या घरा लगतची संरक्षण भिंत अतिवृष्टीने कोसळली आहे. तसेच तालुक्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. Guhagar is hit hard by torrential rains

Tags: GuhagarGuhagar is hit hard by torrential rainsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share182SendTweet114
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.