• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कळंबट येथील स्मशानशेड कामामुळे ग्रामस्थ संतप्त

by Guhagar News
July 30, 2025
in Guhagar
123 2
0
242
SHARES
692
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुमारे ४ लाखांचा खर्च  तरीही ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधीची वेळ!

गुहागपृर ता. 30 रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा योजनेतून चिपळूण तालुक्यातील कळंबट ग्रामदेवता देवरहाटी परिसरात रु. ३,९९,९६८ खर्च करून स्मशानशेड उभारण्याचे काम जानेवारी २०२५ मध्ये सुरू झाले. मात्र सात महिने उलटूनही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराला कामाच्या एक तृतीयांशहून अधिक रक्कम आगाऊ अदा करण्यात आली आहे. Villagers angry over graveyard work

दरम्यान पावसाळा सुरू झाला आणि अपूर्ण स्मशानशेडचे वास्तव समोर आले. शेजारील मोकळ्या जागेत चिखल, गटारे आणि पावसात अंत्यविधी करावे लागत आहे. ही स्थिती गावकऱ्यांना मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यथित करणारी आहे. उभ्या स्मशानशेडच्या शेजारीच ही दुर्दशा घडते आहे. स्मशानशेड ही केवळ भौतिक सुविधा नसून मरणोत्तर सन्मानाची बाब असते. अशा संवेदनशील कामात प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीची टाळाटाळ ग्रामीण भागातील ‘विकास’ नावाच्या संकल्पनेचा कटू वास्तव प्रतिबिंबित होतो. Villagers angry over graveyard work

या रखडलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी ठरवावी, कामाचा दर्जा तपासून ते त्वरित पूर्ण करून स्मशानशेड ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे, आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. Villagers angry over graveyard work

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVillagers angry over graveyard workटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.