गुहागर, ता. 25 शेतकरी नेते जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि शेतकरी आत्महत्या यावर सरकारच्या माध्यमातून ठोस उपायोजना करण्याचे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मदत करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. Patil was met by the office bearers of farmers association

केरळ सरकारने १६ भाजीवर्गीय पिकांना हमीभाव देताना नक्की कोणते निकष ठरवले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट तयार करून केरळला पाठवू, त्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी नेते जालिंदर पाटील यांचाही समावेश असेल असे सांगितले. तसेच एकरकमी एफआरपी मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊन प्रयत्न करू, असेही याप्रसंगी स्पष्ट केले. तसेच शेतकरी आंदोलनात संघटनेच्या ज्या सदस्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, त्यातील अतीगंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेऊ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करून ते मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत आपल्याकडे दिल्यास शासनाच्या माध्यमातून तेही नक्की सोडवू असेही स्पष्टपणे सांगितले. Patil was met by the office bearers of farmers association

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनाप्रणित शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील, वैभव कांबळे, विकास देशमुख, समाधान फाटे, प्रशांत डीक्कर, रवींद्र इंगळे, गजानन पाटील तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Patil was met by the office bearers of farmers association