• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वैकुंठभूमिच्या कामात ठेकेदारांचा नगरपंचायतीला ठेंगा

by Ganesh Dhanawade
July 19, 2025
in Guhagar
121 1
0
Tenga of contractors in Vaikunthabhoomi work
238
SHARES
679
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

काम पूर्ण करण्याची ७ जूनची मूदत उलटूनही काम अपूर्ण

गुहागर, ता. 19 : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने सुरू असलेल्या गुहागर वैकुंठभूमीच्या कामामध्ये नगरपंचायतीने कठोर पावले उचलली असली तरी, ठेकेदारांवर त्यांचा कोणताही परिणाम नाही. यामुळे ठकेदारांनी नगरपंचायतीबरोबर ग्रामस्थ व आक्रमक झालेल्या उबाटाच्या शिवसेनेलाही ठेंगा दाखवील्याचा प्रकार घडला आहे. अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. Tenga of contractors in Vaikunthabhoomi work


गुहागर नगरपंचायतीने ज्या ठेकेदारांना वैकुंठभूमीचे काम दिले आहे. त्यांनी मनाला वाटेल तेव्हा काम सुरू करायची भूमिका कायम ठेवली आहे. मात्र यामुळे सरणावर जाणाऱ्या व्यक्तीलाही मरन यातना भोगण्याची वेळ आली आहे. तर कामे घेतलेल्या ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाचा अंकुशच नाही. १४ वा वित्त आयोगातून सन २०२३ मध्ये मंजूर झालेले गुहागरच्या वैकुंठ भूमिचे काम अजून सुरू असून निर्मिती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावाने कामाचे टेंडर घेतले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात सागर पवार हे ठेकेदार सब ठेकेदार म्हणून करत आहेत. केलेल्या कामाचे सिलिंगचे प्लास्टर न करताच स्लॅबचे खड्डे हाताने भरून कलर देऊन काम पूर्ण झाल्याचे दाखवीले आहेत. तर उर्वरीत पुढील कामाचे अजूनही स्लॅब लावलेला काम सुरू आहे. तर याच ठेकेदाराकडे असलेल्या शोकसभागृहाचेही केवळ स्लॅब टाकून अर्धवट काम करून ठेवले आहे. Tenga of contractors in Vaikunthabhoomi work


या कामाव्यक्तीरिक्त सरणावर जातानाची लागणारी लाकडे पुरवीण्याचे काम नगरपंचायत करते. सदर लाकडे भीजू नयेत म्हणून तब्बल ८ लाख रूपये बजेटची लाकूड शेड नगरपंचायत उभारत आहे. या लाकूड शेडच्या उभारणीचा ठेका नितीश तांबे या ठेकेदाराने घेतला आहे. मे महिन्यामध्ये केवळ जोते घालून काम अर्धवट ठेवून ठेकेदारच गायब झाला होता. मात्र तरूण भारतने सुरूवातीला दिलेल्या बातमीमुळे ठेकेदार नगरपंचायतीमध्ये हजर होऊन ७ जून २०२५ च्या आत काम पूर्ण करतो. असे आश्वासन नगरपंचायत व ग्रामस्थांना दिला होता. त्यानंतर आतापर्यंत केवळ भींती उभारल्या असुन छप्परचे काम गेले महिनाभर
पुन्हा रखडले असून नगरपंचायतीबरोबर ग्रामस्थांनाही ठेंगा दाखवला आहे.
Tenga of contractors in Vaikunthabhoomi work


ठेकेदाराच्या या मनमानी व निकृष्ठ कामामुळे शहरातील शिवसेना उबाठाचे शहराध्यक्ष सिद्धीविनायक जाधव यांनी सदर प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना उबाठाचे सर्व शहरातील पदाधिकारी यांनी वैकुंठभूमीला भेट देत कामाची पहाणी करत निकृष्ट कामावर आक्रमक पावित्रा घेत प्रसंगी आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. मात्र ठेकेदारांना याचा कोणताही परिणाम झालेले दिसुन येत नाही.  Tenga of contractors in Vaikunthabhoomi work


Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTenga of contractors in Vaikunthabhoomi workटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.