कचऱ्यात फेकलेली शासनाच्या पोषण आहाराची पाकीटे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी घेतली ताब्यात
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील जानवळे फाट्याजवळ शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकीटे कच-यात टाकल्याचा प्रकार नुकताच दिसून आला. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर हे आक्रमक झाले. त्यांनी या प्रकाराची प्रिंट मिडिया, सोशल मीडियावर माहिती देऊन एक्सपायर डेट संपली नसतानाही कच-यात फेकलेली शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे शाळेची की अंगणवाडीची असा गंभीर प्रश्न उपस्थित केला. याबाबत तात्काळ चौकशी करावी, असा इशारा विनोद जानवळकर यांनी दिला होता. Group Development Officer orders inquiry


याबाबत गुहागर तालुक्याचे कार्य तत्पर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ यांच्या समवेत घटनास्थळी जाऊन कच-यात टाकलेली शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे पंचनामा करून ताब्यात घेतली व तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुहागरचे कार्य तत्पर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आभार मानून धन्यवाद दिले. Group Development Officer orders inquiry