संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. कुलसचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सावर्डेकर यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. Visit of Santosh Sawardekar to Agriculture College


या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी डाॅ.संतोष सावर्डेकर यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांचे विशेष आभार मानत सह्याद्रि परिवाराशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला.स्वर्गीय माजी खासदार गोविंदरावजी निकम साहेबांच्या आशिर्वाद व पाठिंब्यावर आपले सर्व शिक्षण पुर्ण झाले.त्यांनी दिलेला आधार व आपुलकी याला मी कधीही उतराई होवू शकत नाही तसेच आमदार शेखर निकम यांचे सहाय्य मी विसरु शकत नाही असे प्रतिपादन कुलसचिव डॉ.संतोष सावर्डेकर यांनी केले व येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास माझे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले.या वेळी सह्याद्रि क्रीडा प्रबोधिनी चे अध्यक्ष अनिरुद्ध निकम,महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. Visit of Santosh Sawardekar to Agriculture College