शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली या संस्थेच्या वतीने वाटप
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद शिवराम जाधव यांच्या सौजन्याने जि. प. सडे जांभारी शाळा नं. १ या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये शालेय दप्तर, पाटी, पेन्सिल, पट्टी, रंगपेटी आणि खाऊ असे साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. Distribution of educational material to Sade Jambari students


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत तसेच कुडली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झटणारे माझे वडील कालकथीत आदरणीय शिवराम पांडुरंग जाधव त्यांना सावली सारखी साथ देणारी माझी आई कालकथीत आदरणीय प्रभावती शिवराम जाधव यांच्याकडून आंम्हाला लाभलेला विचारांचा, पुण्यकर्माचा, दातृत्वाचा आणि समाजाचे ऋण फेडण्याचा वसा आणि वारसा आंम्ही जोपासण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थांनी शालेय जीवनात परिश्रम घेऊन आपले जीवन सुखमय करावे. आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करुन आई वडिलांची आणि समाजाची सेवा करावी, असे स्पष्ट मत आनंद शिवराम जाधव यांनी व्यक्त केले. Distribution of educational material to Sade Jambari students


यावेळी हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करणारी कु.साक्षी आनंद जाधव, कु. आर्या आनंद जाधव यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांनी शालेय शिक्षणा बरोबरच खेळाला देखील महत्त्व दिले पाहिजे. वडिलांनी चालवलेले सामाजिक कार्य आमच्या कडून भविष्यात सुरू राहील असा शब्द दिला. त्यानंतर कु. मयुरी महेंद्र जाधव हिने मनोगत व्यक्त करताना विद्यार्थांनी चांगले शिक्षण घेऊन इंजिनियरच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश घेऊन यशस्वी व्हावे. आणि सामाजिक कार्य करत रहावे असे सांगितले. Distribution of educational material to Sade Jambari students


यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. स्नेहल शैलेश सुर्वे यांनी शिव प्रभा सामाजिक संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन धन्यवाद दिले. त्यानंतर सडे जांभारी गावचे पोलीस पाटील प्रभाकर सुर्वे, मुख्याध्यापक अमोल होवाळे, सहकारी शिक्षक दिपक राऊत यांनी हि शिव प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते आनंद शिवराम जाधव यांना पुढील सामाजिक चळवळीसाठी शुभेच्छा देऊन आभार मानले. Distribution of educational material to Sade Jambari students