• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

by Guhagar News
June 25, 2025
in Ratnagiri
129 1
0
Brilliant performance of Khed police
253
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

६० हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुहागर, ता. 25 : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे खेड पोलिसांनी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो ताब्यात घेऊन सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी महामार्गावर पोलिसांकडून वाहतूक तपासणी सुरू असताना एमएच 10 डीटी 6678 क्रमांकाच्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने टेम्पो भरधाव वेगाने पळवला. Brilliant performance of Khed police

मात्र, खेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक येवले यांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून संबंधित टेम्पो अडवला. तपासणीअंती टेम्पोमध्ये १४ पोत्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. प्रत्येक पोत्यात २२ पॅकेट असून एकूण ३०८ पॅकेट्स मिळून आले. प्रत्येकी पॅकेटची किंमत १९८ रुपये असून, एकूण गुटख्याची किंमत ६०,९८४ रुपये इतकी आहे. यासोबतच तस्करीसाठी वापरलेला अशोक लेलँड कंपनीचा ४ लाख रुपये किमतीचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन भोयर व उपनिरीक्षक येवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी अविनाश पारेकर (वय २१, राहणार अद्याप निष्पन्न नाही) या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास खेड पोलीस ठाणे करत आहे. कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल तुषार झेंडे, प्रशांत माळी आणि हवालदार ठाकूर हेही उपस्थित होते. Brilliant performance of Khed police

Tags: Brilliant performance of Khed policeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.