रत्नागिरी, दि. 16 : डाक विभागात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरती करिता मुलाखती घेण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग अथवा सचिन तोडणकर ९४२३०५००६२, गजानन करमरकर ९४२२०१०९३० यांच्याशी संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे अधिक्षकांनी कळविले आहे. Agent Recruitment in Postal Department

इच्छुक उमेदवारांनी 23 व 24 जून 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, व प्रधान डाकघर चिपळूण प्रधान कार्यालय, चिपळूण येथे मुलाखती साठी हजर रहावे. सोबत बायोडाटा, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) घेऊन येणे आवश्यक आहे. Agent Recruitment in Postal Department