गुहागर : वाहनचालक, दुकानदार, विनाकारण फिरणाऱ्यांचा समावेश
गुहागर, ता. 12 : पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीसांनी तब्बल चार लाख, 58 हजार, 200 रुपयांचा दंड वसुल केला. यामध्ये वाहनचालक, दुकानदार, विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती, मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्ती तसेच एका विवाह समारंभावरील कारवाईचा समावेश आहे.
Under the guidance of Inspector Arvind Bodke, Guhagar police collected a fine of Rs 4 lakh, 58 thousand, 200. These include drivers, shopkeepers, people walking around for no reason, without wearing masks, as well as action at a wedding ceremony.
Police Inspector Arvind Bodake Said, It is a pity for the police to collect a fine of Rs 4 lakh. People from talukas like Guhagar should not bring such action against us. If everyone obeys the law and order, we will not have to take the evil of punitive action.
गुहागर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीतील गर्दी कायमच अनियंत्रित असते. त्यामुळे कोरोनाच्या काळात गुहागर पोलीसांनी आपला ठिय्या शृंगारतळीतच बसवला होता. 13 एप्रिलला ब्रेक द चेन या अभियानांतगर्त राज्यात टाळेबंदी सदृश्य निर्बंध लावण्यात आले. या निर्बंधाचा भंग करणाऱ्यावर कायदेशीर, दंडात्मक कारवाईचे अधिकार पोलीसांना देण्यात आले. त्यामुळे गुहागर पोलीसांनी शृंगारतळीत वाहने, दुचाकीचालक यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली. 13 एप्रिल ते 12 मे या कालावधीत पोलीसांनी 680 वाहनचालकांवर मोटारवाहन अधिनियमांतर्गत कारवाई केली. त्यातून 3 लाख 10 हजार 200 रुपयांचा दंड पोलीसांनी वसुल केला. या कारवाईमध्ये ४ खासगी प्रवासी वाहनांकडून प्रत्येकी 10 हजारप्रमाणे 40 हजाराचा दंडही अंतर्भूत आहे.
गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी मास्क तपासणी करण्यासाठी पोलीसांनी पथके नियुक्त केली. या पथकांनी 76 जणांवर कारवाई करत प्रत्येकी 500 रुपयेप्रमाणे 38 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
विनाकारण फिरणाऱ्या लोकांवरही पोलीसांनी कारवाई केली. त्यामध्ये बहुतांशी संख्या शृंगारतळी परिसरातील आहे. तसेच आरटीपीसीआर तपासणी अहवाल सोबत ने ठेवता दुकाने सुरु करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसताना दुकाने सुरु ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई झाली. या कारवाईतून 1 लाखाचा दंड पोलीसांनी वसुल केला. तर अडूर गावात विवाह प्रसंगी गर्दी जमविल्याबद्दल 10 हजार रुपयांची कारवाई पोलीसांनी केली आहे. या सर्व कारवाईत 4 लाख 58 हजार 200 रुपयांचा महसुल पोलीसांच्या तिजोरीत जमा झाला आहे.
चार लाखांचा दंड गोळा करणे ही पोलीसांसाठी खेदाची गोष्ट आहे. गुहागरसारख्या तालुक्यातील लोकांनी अशा कारवाईची वेळ आमच्यावर आणू नये. कायदा व सुव्यवस्थेचे सर्वांनी पालन केले तर दंडात्मक कारवाईचा वाईटपणा आम्हाला घ्यावा लागणार नाही.
– अरविंद बोडके, पोलीस निरीक्षक, गुहागर पोलीस ठाणे