• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात

by Mayuresh Patnakar
May 12, 2021
in Old News
17 0
0
गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य सेविका सौ. रेखा सोनावणे, समाधानाचे क्षण मोलाचे

सातत्याने कोरानासोबत लढून आम्ही थकलो होतो. आशेचा किरण दिसत नव्हता. अशा मनस्थितीत आम्ही सर्वजण असताना डॉ. जांगीडनी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपवर एक व्हिडिओ पाठवला. काहीतरी कामाचा संदेश देणारा व्हिडिओ असेल म्हणून सर्वांनीच तो पाहिला आणी दुसऱ्या दिवशी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वातावरणच बदलून गेलं.

खरतरं आरोग्य सेवेचं व्रत मी स्वत:हून स्विकारल होतं. सासरी ३ नणंदा आरोग्य सेविका म्हणून काम करत होत्या. त्यांनी सांगितलं गोरगरीब जनतेची सेवा ईश्वरसेवा मानून करायची असेल तर या क्षेत्रात ये. पैसा मिळेल पण त्यापेक्षाही जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देवून जाईल. या समाधानाच्या शोधात मी आरोग्य सेविका बनले. आज मागे वळून बघताना खरोखरच समाधान वाटतं. माझ्या सारख्या सामान्य महिलेकडे लोक देवदूत म्हणून पहातात. मला आदर देतात. अशा भावना कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सौ. रेखा सोनावणे यांनी व्यक्त केल्या.

सौ. रेखा 2001 मध्ये विवाहबध्द झाल्या. त्यानंतर 5 वर्ष सांगोला येथे आरोग्य सेविका म्हणून करार पध्दतीने काम करत होत्या. 2016 मध्ये त्या गुहागर तालुक्यातील कोळवली प्राथमिक केंद्रात आरोग्य सेविका म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

गाव नवीन, वातावरण नवीन. माणसं नवीन. या साऱ्याशी जुळवून घेतानाच पदरातील दोन मुलांना शिकवायचं स्वप्न सोबत घेवून त्या काम करत होत्या. अशातच त्याच्या कार्यक्षेत्रातील एका गरोदर मातेचा मृत्यू झाला. आणि सौ. रेखा सोनवणे यांच्यावर आभाळच कोसळंल. आता रिपोर्ट तयार होणार, मेमो येणार, कारवाई होणार या भितीने त्या तणावाखाली होत्या. पण कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांसह प्रत्येकजण धावला रेखा सिस्टरना सावरायला. हे देखील नवं होत. नव्याने नियुक्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला धीर देण्यासाठी सारेजण आल्याने त्यांचा तणाव दूर झाला. आपण सर्वजण एका कुटुंबाचे सदस्य आहोत हा भाव मनी जागला आणि त्या नव्या उत्साहाने कामाला लागल्या.

सारं काही सुरळीत सुरु असताना कोरोना महामारीचं संकट ओढवलं. त्याविषयी सौ. रेखाताई म्हणतात – पहिल्या लाटेत तर सारे जण प्रयोगच करत होते. नेमकं कधी काय करायचं हे समजुन उमजून करण्याऐवजी वरिष्ठांच्या सूचना सांगकाम्या म्हणून पाळत होतो.  पण अनुभवातून शिकायला मिळालं. हा अनुभव दुसऱ्या लाटेत कामी आला. एका अत्यवस्थ रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. हा रुग्ण आठ दिवसांनी उत्तम बरा होवून घरी परतला. घरी येताच त्याने पहिला फोन मला करुन सांगितले की, आज मी जीवंत आहे तो तुमच्यामुळे….

हे असे समाधानाचे, कृतकृत्य करणारे क्षण मोलाचे असतात. ते शोधण्यासाठी आम्ही काम करत असतो.
थोडीशी निराशा आली, कंटाळा आला तरी डॉ. जांगीड सरांनी पाठवलेल्या व्हिडिओतील शब्द आठवतात.

रुक जाना नही तू कही हार के
काँटो पे चलके मिलेंगे साये बहार के…..

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.