• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उत्कृष्ट क्रिकेटर हरपला

by Ganesh Dhanawade
May 9, 2021
in Old News
16 0
0
उत्कृष्ट क्रिकेटर हरपला
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रिक्षा चालक प्रमोद ऊर्फ बावा जांगळी यांचे निधन

गुहागर, ता. 9 : रिक्षा चालक, क्रिकेटर आणि ग्रामोन्नती सेवा संघ गुहागर जांगळेवाडी मंडळाचा 39 वर्षीय युवा कार्यकर्ता प्रमोद ऊर्फ बावा गंगाराम जांगळी याचा आज सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. बावाला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई - वडील, भाऊ प्रवीण, अमोल, त्यांच्या पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे. रिक्षा चालक बावा जांगळी गेल्याची वार्ता कळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. बावा हा निस्वार्थी आणि दिलदार स्वभावाचा असल्याने सर्वांच्या परिचयाचा होता. रिक्षा चालक बावा जांगळी गेल्याची वार्ता कळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. बावा हा निस्वार्थी आणि दिलदार स्वभावाचा असल्याने सर्वांच्या परिचयाचा होता. 
        रिक्षा चालक बावा जांगळी हा गेली अनेक वर्षे रिक्षा व्यवसाय करत आहे. गांधी चौकात बावाची रिक्षा उभी असायची. त्याची रिक्षा कधी नंबरात नसायची करण बावाची रिक्षा नेहमीच कोणीतरी सांगितलेली असायची. वयोवृध्द नागरिकांसाठी तो हक्कचा चालक होता. कुठेही क्रिकेट असो वा डबलबारी भजनाचा सामना, ग्रामदेवतेचा समा (लोटणी), पालकी नाचवणे असुदे या सर्व कार्यक्रमात त्याचा सहभाग हा ठरलेला. श्री. व्याघ्रांबरी देवीचा मानकरी म्हणूनही काम केले आहे. नवरात्री उत्सवात दसर गौरीजवळ मृदुंगमणी असायचा. ग्रामोन्नत्ती सेवा संघ जांगळेवाडी मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होता. सामाजिक, धार्मिक, शिंमग्यातील तमाशा कार्यात त्याचा आवर्जून सहभाग राहिला आहे. 
        प्रमोद याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला दिवस घरीच विलगीकरणात होता. श्वास घेण्यास अडथळा येऊ लागल्याने तीन दिवसांपुर्वी गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारपासून त्याची ऑक्सीजन पातळी कमी होती. शनिवारी ही हीच परिस्थिती राहिल्याने डॉक्टरानी धोका ओळखून व्हेंटिलेटरवर पाठविण्याची व्यवस्था केली. परंतु, व्हेंटिलेटर उपलब्ध झाले पण त्या आदीच प्रमोद याची प्राणजोत माळवली. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सुध्दा प्रमोदच्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. प्रमोद उर्फ बावा याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. रिक्षा चालक मालक संघटनेचाही आधारस्तंभ हरपला आहे.
Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.