• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाढदिवसानिमित्त सोडियम हायपोक्लोराईडची भेट

by Mayuresh Patnakar
May 6, 2021
in Old News
17 0
0
वाढदिवसानिमित्त सोडियम हायपोक्लोराईडची भेट
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुका युवा सेना अधिकारी अमरदिप परचुरे यांचा उपक्रम

गुहागर, ता. 06 :  शिवसैनिक अमरदिप परचुरे यांनी वाढदिवसानिमित्त 700 लिटर सोडियम हायपोक्लोराईड विनामुल्य उपलब्ध करुन दिले. गुहागर तालुकावासीय कोरोनाशी लढत आहेत. त्यामध्ये आपले काही तरी व्यक्तिगत योगदान हवे. या भावनेतून हा उपक्रम राबविल्याचे अमरदिप परचुरे यांनी सांगितले. 

गुहागर शहरात रहाणारे अमरदिप परचुरे हे युवासेनेचे गुहागर तालुका अधिकारी आहेत. तसेच शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानचे कार्यवाहही आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पालशेतचे शाखाप्रमुख मिनार पाटील यांना 300 लिटर सोडियम हायपोक्लोराईड भेट दिले. मिनार पाटील यांनी पालशेत गावामध्ये शिवसैनिकांच्या मदतीने या औषधाची फवारणी केली. गुहागर शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेवून औषध फवारणी करणे आवश्यक होते. ही कल्पना त्यांनी शिवसेनेचे गुहागर शहरप्रमुख आणि गुहागर जीमखानाचे अध्यक्ष नीलेश मोरे यांना सांगितली. तसेच फवारणीसाठी 400 लिटर सोडियम हायपोक्लोराईड भेट दिले. त्यामुळे गुहागर जीमखानाने आरे भंडारवाडा, असगोली आणि गुहागर शहराच्या मुख्य परिसरात फवारणी केली.  आज किरकोळ बाजारात सोडियम हायपोक्लोराईडची किंमत 100  रु. लिटर इतकी आहे. या किंमतीचा विचार केल्यास 7 हजार रुपयांचे हायपोक्लोराईड अमरदिप परचुरेंनी कोरोनाकाळातील भेट म्हणून दिले आहे.

Tags: AdhikariBreaking NewsdonatedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiSodium hypoclorideYuva Senaटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.