• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर जीमखानाने केली औषध फवारणी

by Manoj Bavdhankar
May 6, 2021
in Old News
16 0
0
गुहागर जीमखानाने केली औषध फवारणी

औषध फवारणी करताना गुहागर जीमखानाचे सदस्य

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, आरेगाव भंडारवाडा आणि असगोलीतील मुख्य परिसराचे निर्जंतुकीकरण

गुहागर, ता. 06 : येथील गुहागर जीमखानातर्फे गुहागर शहरासह आरेगाव भंडारवाडा आणि असगोली येथील मुख्य परिसरात सोडियम हापोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. गुहागर शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नगरपंचायतीसह प्रशासकीय यंत्रणांकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे गुहागर जीमखानामधील सर्व सदस्यांनी शहरात औषध फवारणी केली. या उपक्रमांबद्दल शहरवासीयांनी गुहागर जीमखानाचे आभार मानले आहेत. Guhagar Gymkhana disinfected the main area of ​​Guhagar city including Aregaon, Asgoli by spraying Sodium hypocloride.

गुहागर शहरात औषध फवारणी करावी अशी मागणी केले अनेक दिवस नागरिकांकडून होत आहे. गुहागर नगरपंचायत सध्या गृह विलगीकरणा असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या परिसरात तसेच लसीकरण केंद्रात हातपंपाने औषध फवारणी करत आहे. मात्र संपूर्ण शहरात फवारणी करण्यासाठी आवश्यक मोठा पंप, टाकी नगरपंचायतीकडे नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन, बाजारपेठेत औषध फवारणी आजपर्यंत होवू शकलेली नाही.

ही उणीव लक्षात आल्यावर आपण शहरात औषध फवारणीचा उपक्रम राबवुया अशी कल्पना अमरदिप परचुरे यांनी  गुहागर जीमखानाचे अध्यक्ष नीलेश मोरे यांना सांगितली. जीमखानाच्या सदस्यांनाही ही कल्पना आवडली.  कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुहागर जीमखानातर्फे  गरीब व गरजु कुटुंबांना धान्य वाटप  करण्यात आले होते. तसेच शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसेल तर अनेक ग्रामस्थांना वैद्यकिय उपचारांसाठी मोफत वहातूक व्यवस्था पुरवली होती. त्यामुळे अमरदिप परचुरे यांनी सांगितलेल्या उपक्रमाची लगेचच आखणी करण्यात आली. गुहागर शहर, आरेगाव भंडारवाडा आणि असगोली येथील मुख्य परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. सुमारे 400 लिटर हापोक्लोराईड फवारण्यात आले.

या उपक्रमात  कार्तिक कळझुणकर, शैलेश  देवकर , मनिष मोरे, संदीप भोसले,  सुरेश तेलगडे, राकेश साखरकर, रोहन भोसले, राहुल जाधव, संगम मोरे, समिर कनगुटकर, बाबू भोसले, आदेश मोरे, साई देवकर, संगम नरवणकर, निरज बागकर, दिवेश आरेकर, नैनेश बागकर, स्वप्नील जाधव, ऋतिक महाकाळ, कल्पेश बागकर यांनी विशेष मेहनत घेतली.
Tags: Breaking NewsdisinfectedGuhagar​​Guhagar cityGuhagar GymkhanaGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiSodium hypocloridesprayingटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.