• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयपीएलचे सामने तात्पुरते थांबवले

by Mayuresh Patnakar
May 4, 2021
in Bharat
26 0
0
आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक
51
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बीसीसीआय : कोविडच्या संकटामुळे निर्णय

गुहागर, ता. 04 : बायो बबल सुरक्षा फोडून कोरोना खेळाडूंपर्यंत पोचल्याने अखेर इंडियन प्रिमिअर लिग पुढे ढकलल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली. आयपीएलच्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या आरोग्याशी तडजोड करण्याची इच्छा नाही. म्हणून स्पर्धा पुढे ढकलत असल्याचे आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रसिध्द करण्यात आले आहे.  (The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season, with immediate effect.)

चेन्नई सुपर किंग्ज  संघाचे गोलंदाजी प्रशिक्षण बालाजी आणि कोलकत्ता नाईट रायडरचे गोलंदाज संदिप वरियार आणि वरुन चक्रवर्ती यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे सोमवार, 3 मे ला होणारा कोलकत्ता विरुध्दची चेन्नई हा सामना रद्द करावा लागला होता. आज मंगळवारी (ता. 4 मे) सनरायर्झस्‌ हैद्राबाद संघातील खेळाडू वृद्धमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्स्‌ संघाचा गोलंदाज अमित मिश्रा  हे दोघेही कोरोनाग्रस्त झाले.
या पार्श्र्वभुमीवर मंगळवारी सकाळी  बीसीसीआयने तातडीने मिटींग बोलावली. यामध्ये आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अधिकृत घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली. आमच्यासाठी आयपीएलशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करु शकत नाही. कोरोनाच्या वातावरणातून बाहेर पडून देशवासीयांचे क्रिक्रेटद्वारे मनोरंजन करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत होतो. परंतु दिवसेंदिवस परिस्थितीत कठीण होत आहे. अशा काळात खेळाडु, सपोर्ट स्टाफ आदी सर्वांनीच कुटुंबासोबत, प्रियजनांसोबत असणे आवश्यक आहे.   त्यामुळे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकृत प्रसिध्दी माध्यमे, संघ मालक या सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
The BCCI does not want to compromise on the safety of the players, support staff and the other participants involved in organising the IPL. This decision was taken keeping the safety, health and wellbeing of all the stakeholders in mind. These are difficult times, especially in India and while we have tried to bring in some positivity and cheer, however, it is imperative that the tournament is now suspended and everyone goes back to their families and loved ones in these trying times.

अत्यंत कठीण परिस्थितीतही आयपीएल २०२१ आयोजित करण्यासाठी सर्व आरोग्य सेवा कर्मचारी, राज्य संघटना, खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, फ्रँचायझी, प्रायोजक, भागीदार आणि सर्व सेवा प्रदात्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.  त्याबद्दल बीसीसीआयने सर्वांना धन्यवाद दिले आहेत. (The BCCI would like to thank all the healthcare workers, state associations, players, support staff, franchises, sponsors, partners and all the service providers who have tried their best to organise IPL 2021 even in these extremely difficult times.)

आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरुन साभार.
मात्र या निर्णयानंतरही वेगवेगळ्या प्रस्तावांवर चर्चा सुरु आहे. सध्या समोर आलेल्या प्रस्तावांमध्ये उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याचा विचार होत आहे. त्यासंदर्भात संघ मालक, खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्याशी बोलणी झाली आहेत. दुसऱ्या एका पर्यायामध्ये आठ दिवसांनंतर काही सामने रद्द करुन भारतातच ही स्पर्धा पूर्ण करण्याबद्दल ही चर्चा होत आहे.
Tags: BCCIBreaking NewsGuhagarGuhagar NewsIPLIPL 2021IPL GCIPL SuspendeIPL2021Latest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathipostponedseasonVivo IPL 2021आयपीएल 2021टॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share20SendTweet13
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.