अडूरमधील वाद दिड वर्षांपूर्वीचा – पोलीस निरीक्षकांची माहिती
Guhagar, ता. 09 : गुहागरच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीच्या (Transfer of Police Inspector) मागणीवर आम्ही ठाम आहोत. 26 जानेवारी पर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार आहोत. अशी माहिती बौध्दजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. 40 च्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेवून दिली. तर या संस्थेमधील दोन गटांत दिड वर्षांपासून वाद आहेत. (Adur Dispute is Old) त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र्न उद्भवू नये म्हणून मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली असल्याचे पोलिस निरिक्षक सावंत यांनी सांगितले. Adur Dispute News
Adur Dispute News
बौध्दजन सहकारी संघ अडूर शाखेतील पदाधिकाऱ्यांनी आज सेवा मंगल कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेला शाखा क्र. 40 चे दिलीप सदाशिव जाधव (अध्यक्ष), विलास नारायण जाधव (सचिव) आणि पदाधिकारी सचिन सदानंद जाधव, मनिषा सदानंद जाधव (माजी सरपंच), यशवंत धर्माजी जाधव, दिपक प्रभाकर जाधव, राजेंद्र प्रभाकर जाधव, अशोक गोपाळ जाधव, प्रकाश रामा जाधव, आनंद सदाशिव जाधव, प्रथमेश सदानंद जाधव, निकिता दिलीप जाधव, हेमांगी हेमंत जाधव उपस्थित होते.
या सर्वांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांना गुहागरच्या पोलीस निरीक्षकांनी जाणिवपूर्वक अटकाव केला. या दिवशी बौध्दविहाराला टाळे ठोकून आम्हाला कार्यक्रम करण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमचा अपमान झाला. आमच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारींचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक आपल्यावरील आरोप झटकण्यासाठी, आमच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या आमच्याच समाजबांधवांचा आधार घेवून दोन गटांमध्ये वाद आहेत असे भासविण्याचा केविलवाणा व बालिश प्रयत्न करत आहेत. ज्यात्याचप्रमाणे कौटुंबिक भांडणातील वादांना सार्वजनिक करुन आमच्या विरोधात एक गट उभा केला. महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला कोणाचीही तक्रार किंवा हरकत नसताना प्रांत साहेबांची ऑर्डर असल्याने तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही असे धादांत खोटे सांगितले. आम्ही दिलेल्या निवेदनांच्या बातम्या प्रसिध्द होण्याची कुणकुण लागल्यानंतर सारवासारव करण्यासाठी पोलीस निरिक्षकांनी 4 जानेवारीला दोन गटांची बैठक घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र अशी बैठक जाहीर करण्यापूर्वी आम्हाला विश्र्वासात घेतले नाही. शिवाय 3 जानेवारीला रात्री 11.30 वा. पोलिस पाटीलांकरबी आम्हाला बैठकीचे निमंत्रण दिले. परंतू पक्षपातीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यासोबत कोणतीही चर्चा करणार नाही असे सांगून आम्ही बैठकीस येण्यास नकार दिला. Adur Dispute News
![Adur Dispute News : Baudha Vihar](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn102-300x139.jpg)
![Adur Dispute News : Baudha Vihar](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn102-300x139.jpg)
या संपूर्ण प्रकरणामध्ये गुहागरच्या पोलीस निरिक्षकांची येथून बदली व्हावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. या संदर्भातील निवेदन यापूर्वीच मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधिक्षकांना दिले आहे. जर 26 जानेवारीपर्यंत बदली झाली नाही तर आम्ही बौध्दजन सहकारी संघ अडूर, शाखा क्र. 40 चे सर्व पदाधिकारी उपोषणाला बसणार आहोत. आमच्या भूमिकेला अनेक सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला आहे. आजही त्यांची संख्या वाढत आहे. या पत्रकार परिषदेला वैभव पवार, संदिप पवार, रामदास पवार गुरुजी उपस्थित होते. Adur Dispute News
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/adv-1-250x300.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/adv-1-250x300.jpg)
PI Says Adur Dispute is Old
अडूरमधील वाद हे दिड वर्षांपूर्वीपासूनचे आहेत. त्याबाबतची अनेक पत्रे Guhagar Police Station उपलब्ध आहेत. सामाजिक वाद चर्चेतून सुटवेत यासाठी अनेकवेळा आम्ही प्रयत्न केले. मात्र संबंधित गट कधीच उपस्थित रहात नाही. तरीदेखील सर्वांना पुजापाठ करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कधीही अडवले नाही. केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मोठ्या कार्यक्रमांना आम्ही परवानगी दिली नाही. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सावंत यांनी पत्रकारांना दिली. Adur Dispute News
अडूरमधील बौध्दजन सहकारी संघ शाखा क्र. 40 यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अडूरमध्ये बदलीची मागणी करणारा मोठा गट आहे. आणि या गटाविरुध्द तक्रार करणारा छोटा गट आहे. 7 फेब्रुवारी 2024 ला या दोन गटांमध्ये माता रमाई जयंतीच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमांवरुन वाद झाला होता. याबाबत छोट्या गटाने 14 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभुमिवर 14 एप्रिल 2024 ला डॉ. बाबासाहेब आंबडेकर (Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीच्या अनुषंगाने तेथे कोणतेही वाद होऊ नयेत म्हणून 10 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान दोन्ही गटात समझोता घडविण्यासाठी दररोज बैठका घेतल्या. याच दरम्यान 5 एप्रिल 2024 रोजी मोठ्या गटाने आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला पोलीस संरक्षणाची लेखी मागणी केली होती. त्यानंतर 12 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनी तसेच 6 डिसेंबर 2024 ला महापरिनिर्वाण दिनी आम्ही बौध्द विहाराला संरक्षण दिले होते. 11 ऑक्टोबर व 5 डिसेंबरपासून पोलीसांचा पहारा ठेवल्यामुळे रात्रीच्या वेळी बौध्द विहारात प्राणी जावू नयेत म्हणून पहाऱ्यावर असलेल्या पोलीसांनी दार बंद ठेवले ही वस्तुस्थिती आहे. मात्र दुसऱ्यादिवशी दोन्ही गटांना पुजापाठ करण्यास पोलीसांनी अडवले नाही. फक्त मोठा कार्यक्रम करण्यास पोलीसांनी परवानगी दिली नाही. Adur Dispute News
सामाजिक कार्यात कडक कारवाईची भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. उलट या पोलीस ठाण्यात आल्यावर दोन तीन गटात असलेले वाद सोडवून तेथील सार्वजनिक उत्सव सुरळीत होतील यासाठी आम्ही प्रयत्न केले. सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी असलेले वाद मिटावे ही प्रशासनाची भूमिका कायम राहीली आहे.