@Makarand Gadgil


वेडा राघू / बहिरा पोपट | (Green bee- eater)
Scientific name: Merops orientalis


हा किडे खाणारा पक्षी आहे . उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशात याचे वास्तव्य आहे. भारतात हा पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतो. हा पक्षी हिरव्या रंगाचा असून शेपटी एका रेषेप्रमाणे असते. संध्याकाळच्या वेळात हे पक्षी मोठ्या थव्याने विजेच्या तारांवर ओळीने बसलेले असतात . हा पक्षी तारेवर बसलेला असताना उडून जातो आणि भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर बसतो. परत परत त्याच जागी येत असल्याने त्याला ‘वेडा राघू ‘असे नाव पडले आहे. वेड्या राघुचा प्रजननाचा काळ मार्च ते जून महिन्यांमध्ये असतो. सामान्यपणे ते एकेकट्याने घरटे बांधतात . हे घरटे वाळू असलेल्या काठावर एक बोगदा करून तयार केलेले असते . त्याने तयार केलेले घरटे ‘ ५ फूट ‘ लांबीचे सुद्धा असू शकते .बोगद्याच्या टोकाशी थेट मातीवर तीन ते पाच अंडी घातली जातात .ही अंडी अगदी गोल व पांढरी असतात . अंड्याचे प्रमाण पावसाचे मान आणि किटकाची उपलब्धता यावर अवलंबून असते .साधारणतः 14 दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात

