• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

by Ganesh Dhanawade
April 30, 2021
in Old News
19 0
0
गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. ढेरे : वयोवृध्दांसाठी घरी येवून टेस्टची सुविधा, 24 तास सेवा

गुहागर, ता. 30 : गुहागरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यू होण्याच्या घटनांमुळे कोरोनावर लवकरात लवकर निदान होऊन तात्काळ उपचार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार शहरातील ढेरे क्लिनिक येथे कोविड-१९ रॅपिड अॅन्टीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (Now in Guhagar City Rapid Antigen Test Facility is available in Dhere Clinc.)

       जिल्ह्यासह गुहागर तालुक्यात कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आता केवळ सर्दी, ताप, खोकला एवढीच कोरोनाची लक्षणे नाहीत. दम लागणे, चक्कर येणे, सहन न करता येणारी डोकेदुखी अशी आणखी काही लक्षणांची भर त्यात पडली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  आपल्याला जरा जरी शंका आली तरी संबंधित व्यक्तीने अँटीजेन टेस्ट करणे हा कोरोना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी ताबडतोब निकाल देणारी अँटीजेन टेस्ट केल्यास संशयीत कोरोनाग्रस्ताचे निदान होते.

आज गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात अँटीजेन टेस्ट करण्यासाठी जाणे सर्वांनाच मानसिकदृष्ट्या पटत नाही. मात्र अन्य कुठेही कोरोना तपासणी करण्याची व्यवस्थाच नव्हती. आज डॉ. निलेश ढेरे यांच्या ढेरे क्लिनिकमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एखाद्याला त्रास होत असेल तर ढेरे क्लिनिकमध्ये जावून आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी. If any Old Age Person / Any serious Patient of other disease in Home Dhere Clinic Health Worker giving Home Service for Corona Test.

ढेरे क्लिनिकमध्ये 24 तास रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची सेवा सर्वांसाठी डॉ. निलेश ढेरे यांची उपलब्ध केली आहे. तसेच आपल्या घरामध्ये प्रवास न करु शकणारी अत्यवस्थ, वयोवृध्द मंडळी असतील तर ढेरे क्लिनिकमधील आरोग्य कर्मचारी थेट घरी पोचून कोरोना चाचणी करणार आहेत. त्यासाठी ९७६६०३५९००, ८२७५६३५९००, ७६२०१८०६१८, ९५५२४९१७८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. ढेरे यांनी केले आहे.
Tags: Breaking NewsCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiकोरोनाकोरोना बातम्यागुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share15SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.