• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

by Manoj Bavdhankar
April 29, 2021
in Old News
18 0
0
सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

गुहागर : स्मशानभुमीत राजेश शेटे यांच्याकडून लाकडे ताब्यात घेताना नगरपंचायतीचे अधिकारी

36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे सैनिक राजेश शेटे यांची नगरपंचायतीला मदत

गुहागर, ता. 29 : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाने मृत पावणाऱ्या व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गुहागर नगरपंचायतीची आहे. अंत्यसंस्कारांसाठी सरणाची आवश्यकता असते. हे लक्षात घेवून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांनी ४ टन लाकडे नगरपंचायतीला दिली आहेत. Rajesh Shete Donate 4 ton Firewood to Guhagar Nagarpanchayat.

कोरोनाच्या संकटात गुहागर तालुक्यातील रुग्णांना लवकर उपचार मिळावेत म्हणून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर (Dedicated Corona Health Centre) सुरु करण्यात आले आहे. मात्र तालुक्यातील रुग्ण अत्यवस्थ झाल्यावर उपचारांसाठी धावत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेत गुहागरमध्ये रुग्णालय नव्हते. त्यामुळे प्रशासनावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कमी प्रमाणात आली. यावेळी गुहागर शहरातच रुग्णालय झाल्याने कोविडग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गुहागर नगरपंचायतीवर आली आहे. गेल्या १५ दिवसात अशा 3 रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागले. भविष्यात हे प्रमाण वाढले तर गुहागर नगरपंचायतीचे लाकुडसाठ्याचे केलेल्या नियोजन कोलमडून पडेल. अधिक लाकुडसाठ्याची खरेदी करावी लागेल. सुकी लाकडे मिळाली नाहीत तर पावसाळ्यात नागरिकांची अडचण होईल. या सर्व गोष्टींचा विचार करुन गुहागरमधील हॉटेल राजगडचे मालक, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांनी 4 टन लाकुडसाठा गुहागर नगरपंचायतीला विनामुल्य उपलब्ध करुन दिला आहे. हा लाकुडसाठा नगरपंचायतीचे अधिकारी मंगेश पेढामकर आणि जगदाळे यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटप्रमुख व सभापती उमेश भोसले, युवा सेना शहर अधिकारी राकेश साखरकर, किरण शिंदे उपस्थित होते.

यासंदर्भात गुहागर न्यूजशी बोलताना राजेश शेटे म्हणाले की, मृत्युनंतरचे क्रियाक्रम करणे हे पुण्यकर्म आहे. आज कोरोनाच्या भयावह स्थितीत इच्छा असूनही आम्ही नगरपंचायतीला या कामात मदत करु शकत नाही. अशावेळी नगरपंचायत करत असलेल्या कामाला हातभार लावण्यासाठी सरण देणे हे मला शक्य होते. ही गोष्ट मी माझ्या काही मित्रांजवळ बोललो. त्यांना ही कल्पना आवडली. लगेचच लाकुड व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांनीही अत्यंत कमी वेळात लाकुडसाठा उपलब्ध करुन दिला. त्यामुळे कोरानाच्या लढाईत खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मला मिळाले आहे.

राजेश शेटे यांनी गुहागर नगरपंचायतीला केलेली मदत ही आजच्या परिस्थिती बहुमुल्य आहे. त्यांच्या या मदतीबद्दल मी व्यक्तिश: त्यांना धन्यवाद देतो.

समीर घाणेकर, नगरसेवक, गुहागर नगरपंचायत
Tags: Breaking NewsCorona In GuhagarCorona NewsCovid19DonateFireWoodFuneralGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMNSNagarpanchayatNews in GuhagarNews in MarathiWorkerअंत्यसंस्कारकोरोनाकोरोना बातम्यागुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.