• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

85 वर्षीय संघस्वयंसेवकाचे जीवन समर्पण

by Mayuresh Patnakar
April 27, 2021
in Old News
16 0
0
85 वर्षीय संघस्वयंसेवकाचे जीवन समर्पण
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्वत:चा ऑक्सिजन बेड दिला चाळीशीतील तरुणाला

गुहागर, ता. 27 : समाजाचे आपण देणं लागतो या संघ संस्कारात वाढलेली व्यक्ती प्रसंगी जीवन समर्पणही करु शकते. याचे उदाहरण नागपुरच्या नारायण दाभाडकरकाकांनी कोरोनाच्या संकटात सर्वांसमोर ठेवले आहे. माझे आयुष्य शेवटच्या वळणावर आहे. चाळीशीतील तरुण वाचला पाहिजे, या भावनेने इंदिरा रुग्णालयातील स्वत:चा ऑक्सिजन बेड त्यांनी या तरुणासाठी रिकामा केला. आणि अखेर घरी जावून शेवटचा श्र्वास घेतला. समाजासाठी इतका टोकाचा विचार संघ स्वयंसेवक करतो हेच आज दाभाडकरकाकांनी दाखवून दिले.
Dabhadkar Kaka an 85 Year Old Sangh Swayamsevak Sacrifice his life for 40th Years man who was in critical Condition.

ही गोष्ट आहे नागपुरमधील नारायण दाभाडकर यांची. दाभाडकर काकांना त्याच्या परिवारातील मंडळी चॉकलेटवाले काका म्हणून ओळखायची. दाभाडकर काका त्यांच्या तरुणपणी कोणत्याही सभा संमेलन, रॅलीला गेले की त्यांचे खिसे चॉकलेटने भरलेले असायचे. कार्यक्रम संपला की सोबतच्या बच्चेकंपनीबरोबर मोठ्यांना देखील चॉकलेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरु व्हायचा. असे हे दाभाडकर काका परोपकारी म्हणून सावित्री विहारमध्ये आणि शहरामध्ये परिचित होते.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेते (Second Wave) 85 वर्षाच्या दाभाडकर काका कोरोनाबाधित (Corona) झाले. घरीच औषधोपचार सुरु होते. मात्र मंगळवारी (ता. 27) सकाळी अचानक त्यांची तब्यत बिघडली. शरिरातील ऑक्सिजनची पातळी घटली. सर्वच रुग्णालयातील ऑक्सिजनचे बेड भरलेले होते. अखेर नागपुरमधील इंदिरा रुग्णालयात एक ऑक्सिजन बेड (Oxygen Bed)असल्याची माहिती मिळाली.  नातेवाईक त्यांना रुग्णवाहिकेने इंदिरा रुग्णालयात घेवून गेले. तेथे केसपेपरची पुर्तता करे पर्यंत दाभाडकर काका स्वत:च कोरोनाच्या ऑक्सिजन वॉर्डमध्ये गेले. त्यांच्यासाठी बेडही रिकामा होता. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. तेवढ्यात त्यांच्या कानावर एका तरुण महिलेचा आक्रोश ऐकू आला. काहीही करा पण माझ्या नवऱ्याला वाचवा अशी आर्त विनवणी ती डॉक्टरांजवळ करत होती. ही गोष्ट दाभाडकर काकांच्या लक्षात आली. आणि त्यांनी तातडीने निर्णय घेतला. डॉक्टरांना आपला बेड त्या तरुण कोरोनाग्रस्ताला देण्यास सांगितले. नातेवाईक, डॉक्टर हर प्रकारे दाभाडकरकाकांना समजाविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु दाभाडकरकाकांचे एकच म्हणणे होते. माझे आयुष्य आता संपले आहे. त्या चाळीशीच्या तरुणाचा संसार अपूर्ण आहे. तो वाचला तर त्याचे कुटुंब चालेल. संसार तरेल.  कोणाचेही न ऐकता धापा टाकतच दाभाडकर काका रुग्णालयातून बाहेर पडले. नातेवाईकांनी त्यांना घरी आणले. पण अखेर घात झालाच. दाभाडकरकाकांनी आपले आयुष्य त्या चाळीशीतील तरुणाला दान केले होते. एका 85 वर्षांच्या संघ स्वयंसेवकाने एका तरुणासाठी प्राणांची आहुती दिली.


साभार

न्यूज भारती.कॉम

ऑपइंडिया.कॉम

Tags: Breaking NewsCoronaCorona NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.