सीआयएसएफने साजरा केला अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वीज प्रकल्पाची सुरक्षा करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते. दि. १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत सीआयएसएफचे उपकमांडंट पॉल के. वैफेई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सप्ताह सांगता समारंभाच्या निमित्ताने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अग्निशामक दलाने विविध प्रात्यक्षिकांद्वारे या विभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कोरोना काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करत या सप्ताहत विविध उपक्रम घेण्यात आले. साजरा करण्यात आला. The National Fire Service Safety Week was organized by the Central Industrial Security Force (CISF) personnel guarding RGPPL power plant in Guhagar. CISF firefighters presenting various thrilling demonstrations on firefighting in Gas leaks, plane crashes and other fire accidents.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने औद्योगिक प्रकल्पात अग्निशमन सुरक्षा कशी असली पाहिजे याची माहिती जवानांना देण्यात आली. तसेच वीज कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आगीची भिषणता, धोके, आगीपासून वाचण्याचे मार्ग आदी गोष्टींची माहिती जवानांनी दिली. त्यासाठी काही विभागांना जवानांनी थेट प्रात्यक्षिकेही करुन दाखवली. अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारंभ वीज कंपनीच्या पॉवरब्लॉक येथील अग्निशमन दलाच्या परेड मैदानावर संपन्न झाला. सीआयएसएफ अग्निशमन दलाच्या बहादूर जवानांनी वायुगळती, विमान दुर्घटना व अन्य आग दुर्घटनात आगीपासुन बचाव करतानाचे विविध लक्षवेधी, चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला आरजीपीपीएलचे व्यवस्थापकिय संचालक आसिमकुमार सामंता, सामान्य व्यवस्थापक एच.एस. बावा, सीआयएसएफचे उपकमांडंट पॉल के. वैफेई, अग्निशमन सहाय्यक कमांडट बी. आर. इंदोरीया, आरजीपीपीएलचे व सहयोगी कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थित होते.