• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओसाड जागेत विनाखर्च ऑक्सिजन प्लॉन्ट उभारा

by Mayuresh Patnakar
April 24, 2021
in Old News
19 0
0
Forest
37
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणातील जमीनमालकांना साथ साथ ट्रस्टचे आवाहन

गुहागर, ता. 24 : हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जंगलांची निर्मिती हा एकच पर्याय मनुष्यासमोर आहे. त्यामुळे आपल्या ओसाड पडलेल्या जागांवर जंगलाच्या निर्मितीतून ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा उपक्रम साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतला आहे. जागेच्या मालकी हक्कात कोणताही बदल न करता झाडे लावणे, देखभाल करणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे शरद जोशी यांनी सांगितले.
The only option for humans is to create forests to maintain the right amount of oxygen in the air. The Sath Saath Charitable Trust has undertaken the task of planting trees. Without any change in the ownership of the land Sath Sath Charitable Trust will do Plantation and Maintains of Trees Said Sharad Joshi, Main Trustee of Sath Sath.

जोशी म्हणाले की, साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने या उपक्रमाचा पहिला प्रयोग वेळणेश्र्वरमधील एका ओसाड जागेत केला. कोकणातील जंगलात असणारी वड, पिंपळ, जांभुळ, हरडा, बेहडा, चिंच आदी 400 झाडे लावली. दोन वर्षांनंतर यापैकी 100 झाडे जगल्याचे लक्षात आले.  या ट्रस्टने त्याच्या मालकीच्या जागेतही असाच प्रयोग केला. हा प्रयोग करताना सुरवातीपासून झाडांची देखभाल केली. त्यामुळे कातळावरही खड्डे मारुन झाडे लावली तर अधिक झाडे जगतात असे लक्षात आले. दोन ठिकाणचे प्रयोग यशस्वी झाल्यावर साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने हा उपक्रम अभियान म्हणून राबविण्याचे निश्चित केले आहे.

या अभियानामध्ये त्यांना ओसाड जमीनी हव्या आहेत. या जमीनी जागामालकाच्याच ताब्यात रहाणार आहेत. फक्त मालकाने पुढील २५ वर्ष ही जमीन विकु नये. लावलेली झाडे तोडू नये.  25 वर्षांच्या आधी जमीन ताब्यात घेवू नये.  साथ साथच्या मंडळींना जमीनीत वावरण्यासाठी आडकाठी करु नये. अशी किमान अपेक्षा ट्रस्टने ठेवली आहे. तशाप्रकारचा करार बॉन्डपेपर मालकाने करुन द्यायचा आहे. अशी जमीन मिळाल्यावर साथ साथतर्फे सदर जमीनीत पाण्याची उपलब्धता, कोणती झाडे लावावीत याचा अभ्यास करेल. झाडे लावल्यावर जमीनीला  जागामालकाच्या उपस्थितीत निवडुंग, करवंदी आदी झाडेंचे कच्चे कुंपण तयार केले जाईल. लावलेल्या रोपांवर लक्ष ठेवणे, आणखी झाडे लावणे असा उपक्रम तीन वर्ष केला जाईल. सदर जागेत व्यावसायिक उत्पन्न देणारी झाडे लावली जाणार नाहीत. या सर्व उपक्रमामध्ये जमीन मालकही कार्यकर्त्याच्या भुमिकेतून साथ साथला मदत करुन शकतो. 25 वर्षांनंतर करार रद्द करुन सदर जागा झाडांसह मालकाच्या ताब्यात दिली जाईल. या अभियानामध्ये सहभागी होवू इच्छीणाऱ्या जमीन मालकांनी साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी शरद जोशी ( 9869459804) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags: Breaking NewsForestGuhagarGuhagar NewsLandLatest Marathi NewsLatest NewsMaintainMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiOwnershipoxygenPlantPlantationटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.