जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा : सध्याची परिस्थिती नियंत्रणात
गुहागर, ता. 15 : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत. जनतेने पुढील 15 दिवस शासनाच्या निर्बंधांचे पालन केले तर आपण कोविडविरुध्दचे युध्द नक्कीच जिंकु असा विश्र्वास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केला. Today the Situation is under control Said Ratnagiri Collector Laxminarayan Mishra in Press Conference,
पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधताना जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले की, सध्या रेमिडीवीसीवर आपले नियंत्रण आहे. ऑक्सिजनचा तुटवडा नाही. ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा जिल्ह्यात बसविण्यात आली आहे. त्याद्वारे पुढील आठवड्यात ऑक्सिजन निर्मिती सुरु होईल. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहे. कोविड हेल्थ सेंटरची संख्या आपण वाढवत आहोत. आरोग्य विभागाला मदत करण्यासाठी निवृत्त नर्स, अन्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, खासगी व्यवसाय करणारे डॉक्टरर्स पुढे येत आहेत. ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह व अभिनंदनीय आहे.
सध्याच्या कोविड रुग्णांमधील 60 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यापैकी 80 टक्के कोविड रुग्णांची वयोमर्यादा 45 च्या आतील आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याचा दरही उत्तम आहे. जिल्ह्यात कोविड मृत्युचा दर केवळ 1.5 ते 2 टक्के आहे. मात्र याच वयोगटातील व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. ही चिंतेची बाब आहे. म्हणूनच राज्य सरकारने घालुन दिलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. 60 % Asymptomatic Patient in Ratnagiri District, In Between those 40 % Corona Patients are Below 45 Age.


घरपोच सेवा द्या (Home Delivery)
ज्या व्यावसायिक आस्थापनांना (अत्यावश्यक सेवांमधील दुकाने) निर्बंधातही व्यवसाय करण्याची मुभा आहे त्यांनी कोरोना तपासणी (आरटीपीसीआर टेस्ट) करुन घेणे बंधनकारक आहे. या आस्थापनांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्यायची आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे द्या. कोणत्याही शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांना शाळेत बोलावू नये. शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त निर्बंधांचे तंतोतंत पालन केले तर जिल्ह्याती कोरोना संक्रमण वेगाने कमी होईल. ही सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच जिल्ह्यामध्ये राजकीय कार्यक्रमांसह, लग्न, मुंज आदी समारंभ होवूच नयेत यासाठी आम्ही आग्रही आहोत
तपासणी नाके कार्यान्वित Check Post Activated
सार्वजनिक वहातूक बंद नसल्याने येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी करणाऱ्यावर आम्ही भर दिला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वे स्थानकांवर तपासणी केंद्र उघडली आहेत. अन्य जिल्ह्यातून खासगी वाहनाने येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्वीचे तपासणी नाके सुर करण्यात आले आहेत. याठिकाणी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी, प्रवाशांची तपासणी आणि चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यांची वाहने ताब्यात घेतली जाऊ शकतात. कागदपत्रे नसतील तर कारवाई होईल.


लसीकरण ( Covid Vaccination)
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. लसीकरण झालेल्या व्यक्तिला कोरोना संसर्ग झाला तरी त्या व्यक्तीची प्रकृती ढासळत नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. आज जिल्ह्यात 70 ठिकाणी दिवसाला 5 ते 6 हजार व्यक्तींना लस देण्याची क्षमता निर्माण केली आहे.
ऑन कॉल टेस्टींग (On Call Testing)
जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि रत्नागिरी शहरात आपण मोबाईल टेस्टींगची सुविधा निर्माण केली आहे. जे लोक तपासणी केंद्रावर जावून कोरोना चाचणी करु शकत नाहीत त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. नोंदणी केल्यानंतर मोबाईल व्हॅनमधुन कर्मचारी आपल्यापर्यंत पोचतील आणि तुमची कोरोना चाचणी करतील.