विनायक बारटक्के : महामार्ग रुंदीकरणाला साथ देण्यासाठी स्थलांतर
गुहागर : गुहागरवासीयांना गेली 30 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री व सेवा देणारे मंगेश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे स्थलांतर भव्य वास्तूत झाले आहे. काही वर्ष युनियन बँकचे कामकाज चालणाऱ्या पहाट या इमारतीमध्ये हे दुकान सुरु झाले आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाला साथ देण्यासाठी दुकान स्थलांतरित केल्याची माहिती व्यापारी विनायक बारटक्के यांनी दिली.
The Mangesh Electronics shop has been relocated in New Building at Fish Market Area in Guhagar. Vinayak Bartakke informed that the shop has been shifted to support the widening of the Guhagar Vijapur National Highway.
मंगेश इलेक्ट्रॉनिक्स हे गुहागरमधील पहिले इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे दालन विनायक बारटक्के यांनी 30 वर्षांपूर्वी सुरु केले. गुहागर चिपळूण हा प्रवास देखील सहजसाध्य नव्हता अशा काळात नामांकित कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री गुहागरमध्ये विनायक बारटक्के यांनी सुरु केली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीबरोबरच विक्री पश्चात सेवेलाही या व्यवसायात तितकेच महत्त्व आहे. विविध कंपन्यांची उपकरणे असल्याने त्या त्या कंपनीच्या तांत्रिक विभागाची जोड विक्री पश्चात सेवेसाठी आवश्यक असते. विनायक बारटक्के यांनी विक्री पश्चात सेवा देखील उत्तम प्रकारे दिल्याने आज तालुक्यातील अनेक ग्राहक मंगेश इलेक्ट्रॉनिक्सशी जोडले गेले आहेत.
This is first Electronic Shop in Guhagar. For the past 30 years, Vinayak Bartakke has been providing electronics equipment sales and after-sales service to customers.
गुहागर बाजारपेठे व्याडेश्र्वर मंदिराच्या बाजुला असलेल्या दुकानांच्या रांगेत विनायक बारटक्के यांचे दुकान आजपर्यंत कार्यरत होते. मात्र गुहागर विजापूर महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये ही जागा जाणार आहे. त्यामुळे गेले काही महिने विनायक बारटक्के आपल्या दुकानाला योग्य जागा शोधत होते. 2020 च्या दिवाळीत गुहागर मच्छीमार्केट परिसरात असलेल्या युनियन बँकेचे स्थलांतर झाले. त्यामुळे ही जागा विनायक बारटक्के यांना उपलब्ध झाली.
पहिल्या दुकानापेक्षा अधिक जागा मिळाल्याने मंगेश इलेक्ट्रॉनिक्सच्या या दुकानामध्ये विविध कंपन्यांचे एल.ई.डी. टीव्ही, रेफ्रीजेटर, वॉशिंग मशिन, ए.सी., फॅन, घरघंटी, साऊंड सिस्टीम, डि.टी.एच. या उत्पादनांची आकर्षक मांडणी करणे शक्य झाले आहे. आज सोनी, एल.जी, हायर, गोदरेज आदी नामांकित कंपनीची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना विविध उत्पादने एकाच ठीकाणी पहाण्याची व खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
स्थलांतरीत वास्तुला भेट देवून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हमखास डिस्काऊंट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बजाज फिनसर्व्ह या वित्तीय संस्थेद्वारे थेट कर्जाची उपलब्धताही येथे आहे. अशी माहिती मंगेश इलेक्ट्रॉनिकचे मालक विनायक बारटटक्के यांनी दिली.
Special discounts have been arranged for customers who visit New shop and make a purchase. There is also the facility of direct loans through Bajaj Finserv. This information was given by Vinayak Bartatkke, owner of Mangesh Electronic.