तटकरे आणि गीतेंची बलस्थाने कोणती
Guhagar News Special : कोकणातून जवळजवळ दिसेनाशी झालेली काँग्रेस, अलिबाग, पेण आणि काही प्रमाणात रोहा तालुक्यात शिल्लक असलेला शेकाप आणि समाजाच्या बळावर Anant Geete विजयाचा दावा करीत आहेत. तर मोदींसाठी भाजपने आणि अस्तित्वासाठी राष्ट्रवादीने सुनील तटकरेंची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सध्या चुरशीची वाटणाऱ्या लढतीत गीते आणि तटकरेंची बलस्थाने कोणती आहेत, कोणते मुद्दे विजयश्री खेचून आणू शकतात याचा घेतलेला आढावा. Who will win Raigad Lok Sabha?
Who will win Raigad Lok Sabha?
Raigad Lok Sabha मतदारसंघात मागील निवडणुकीत Sunil Tatkare यांनी ३१ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे आताची निवडणूक सुनील तटकरेंसाठी सोपा विजय मिळवणारी असायला हवी होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबाबत असलेली सहानुभुती, सत्तेसाठी युतीला जवळ करणाऱ्या राष्ट्रवादीबद्दल असलेला राग, दोन पक्ष फोडण्यासाठी कारणीभूत ठरलेला भाजप आणि सत्ताकेंद्रीय तटकरे कुटुंब असे अनेक विमर्श लोकसभा निवडणुक जाहीर होण्याआधीच प्रस्थापित झाले. त्यामुळेच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ही निवडणुक चुरशीची, तटकरेंसाठी अटीतटीची असल्याचे सांगितले जात आहे. Who will win Raigad Lok Sabha?
Raigad Lok Sabhaसाठी भाजपने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात दौरेही केले होते. महाडचे आमदार Bharat Gogavale यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी ही जागा शिवसेनेसाठी मागितली होती. मात्र महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीने सध्या खासदार व प्रदेशाध्यक्ष असलेल्या Sunil Tatkareसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनवली. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेच्या गुऱ्हाळात ही जागा जाहीर करण्यास महायुतीला विलंब झाला.
तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आपल्याला कमी जागा मिळतील अशा भितीपोटी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने काही जागांवर आधीच आपला उमेदवार जाहीर केला. येथील सध्याचे खासदार राष्ट्रवादीचे असल्याने जागावाटपात शरद पवार ही जागा आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात. हे ओळखून जवळपास दिड वर्षांपूर्वीच अनंत गीतेंनी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच हे जाहीर करुन टाकले होते. शिवसेनेचे नेते असलेल्या अनंत गीतेची शिवसेनेविषयी असलेली निष्ठा, समर्पण आणि ज्येष्ठत्व यामुळे त्यांनीच जाहीर केलेल्या उमेदवारीवर शिवसेनेतून ब्र काढायची कोणाचीही हिंमत झाली नाही. यथावकाश Anant Geete हे Raigad Lok Sabhaचे उमेदवार असल्याचे उ.बा.ठा.शिवसेनेने जाहीर केले.
अनंत गीतेंची बलस्थाने
अनंत गीते गेल्या दीड वर्षापासून Raigad Lok Sabha निवडणुकीची तयारी करत आहेत. समाजाच्या भरवशावर आपण निवडुन येऊ, असा आत्मविश्र्वास त्यांच्याजवळ आहे. शिमगोत्सवाबरोबर निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी महायुती, तटकरे यांच्याविरोधात प्रस्थापित केलेल्या विमर्शांनीही वातावरण निर्मिती केली. मतदानापर्यंत हे विमर्श टिकतील याची काळजी आता महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्राने रायगड मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. आपल्या पक्षांचा विस्तार करताना पूर्वीच्या शिवसेना (एकत्रीत) आणि भाजपने रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात भक्कम असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा आणि काँग्रेसचा पायाच डळमळीत केला. याच रिक्त जागेत राष्ट्रवादीनेही हातपाय पसरले. आता अशाच काँग्रेस आणि शेकापला सोबत घेवून अनंत गीते यांना विजयाची वाट रायगडमध्ये निर्माण करायची आहे. त्यासाठी आता Minakshi Patil यांच्याबद्दल सहानुभुती निर्माण करण्याचा प्रयत्न रायगडमध्ये केला जात आहे. बळीराज सेनेने या जागेसाठी उमेदवारी जाहीर केली मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत बळीराज सेनेचा अर्ज भरला गेला नाही. त्यातून समाजाच्या मतांची विभागणी थांबविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आता ही समिकरणे अनंत गीतेंना विजयाचा पल्ला गाठून देणार का (Who will win Raigad Lok Sabha?) हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सुनील तटकरेंची बलस्थाने
पेणचे आमदार रवीशेठ पाटील, महाडचे आमदार भरत गोगावले, श्रीवर्धनच्या आमदार व मंत्री आदितीताई तटकरे, दापोलीचे आमदार योगेश कदम, विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे अशी आमदारांची फौज रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरेंच्या बाजुला आहे. गुहागर विधानसभेत भाजपचे विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे बळ तटकरेंच्या मागे उभे केले आहे. मनसे मोदींसाठी सहकार्य करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. विविध समाजांची मते आपल्या पारड्यात पडावीत यासाठी गेल्या पाच वर्षात in Raigad Lok Sabha सुनील तटकरे यांनी या समाजांच्या प्रमुखांना आपल्यासोबत घेतले आहे. त्यामुळे मतदानपर्यंतच्या टप्प्यात महायुतीतील सर्व घटक पक्षांनी युतीधर्म पाळला. एकजुटीने काम केले. आपल्यासोबत घेतलेल्या मंडळींनी नियोजीत काम यशस्वी केले तरच तटकरेंचा विजय सोपा होऊ शकतो. Who will win Raigad Lok Sabha?