नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली होती मागणी
गुहागर, ता. 07 : गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे अधिक सक्षमपणे सुरु रहाणार आहे. अशी प्रतिक्रिया गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी घाईगडबडीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
Mayor of Guhagar said, There has been no discussion about the deputy mayor any where. NCP’s taluka president Rajendra Arekar hastily refused to comment.
गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे सलग दोन टर्म निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुजता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी केली आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडेहि त्यांनी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, याबाबत बातमी प्रसिद्ध होताच उपनगराध्यक्ष पदाबाबत जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्याकडे विचारणा केली असता गुहागर नगरपंचायतीमधील काही लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. मात्र उपनगराध्यक्षावरुन आलेल्या बातमीवर इतक्या घाईगडबडीने प्रतिक्रिया देता येणार नाही. असे सांगितले. तर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे अधिक सक्षमपणे सुरु रहाणार आहे.
या दोघांच्या प्रतिक्रियांमुळे सध्या तरी उपनगराध्यक्ष पदाबाबत कोणत्याही हालचाली होणार नाहीत हे समोर आले आहे.
संबंधित बातमी
राष्ट्रवादीच्या सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या.