महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायती, २ पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषदेचा समावेश
गुहागर, ता. 03 : केंद्र शासनातर्फे अंजनेवल ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी (पडताळणी वर्ष २०१९-२०) कोकणातील ५ जिल्ह्यामध्ये हा पुरस्कार मिळवणारी ही एकमेव ग्रामपंचायत आहे. महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायती, २ पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषदेला हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे दिवशील दिल्लीला होणार आहे.
Anjanwel Grampanchyat is Selected for Deen Dayal Upadhyay Panchayat Sashaktikaran Puraskar (DDUPSP). This only a grampanchayat in Konkan Region.
2011-12 या वर्षापासून भारत सरकारतर्फे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कल्पकतेने वेगवेगळ्या योजना तयार करुन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे. आणि या योजनेतुन झालेला विकासाचे दृष्य स्वरुप तयार करणाऱ्या ग्रामपंचायतींना पंडित दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ग्रामपंचायतींची निवडीसाठी केंद्र सरकार एक प्रश्र्नावली देते. यामध्ये ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्रामसभांची उपस्थिती, त्यामध्ये होणारे ठराव, त्यांचे क्रियान्वयन, मागासवर्गीयांचा ग्रामसभांमधील सहभाग, नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील काम, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लोकाभिमुख विकास, महसुल वाढ, मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलेल्या योजता आदी अनेक मुद्द्यांचा समावेश असतो.
Panchayats have a significant role to play in the effective and efficient implementation of flagship schemes for transformation of rural India. There are many outstanding performers among Panchayats all over the country and such Panchayats need to be identified and encouraged. Ministry of Panchayati Raj (MoPR), Government of India has been incentivizing the best performing Panchayats recommended by the State Governments/UT Administrations since 2011-12. The awards are given on the National Panchayati Raj Day celebrated on 24th of April every year.
गुहागर तालुक्यातून पाटपन्हाळे आणि अंजनेवल या दोन ग्रामपंचायतींची निवड विभाग स्तरापर्यंत झाली होती. त्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे नांव मागे पडले. अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष तपासणीसाठी जानेवारी 2021 मध्ये कोल्हापुर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आले होते. 31 मार्चला अंजनवेल ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. याबाबतचे पत्र 2 एप्रिलला सायंकाळी पंचायत समिती मार्फत अंजनवेल ग्रामपंचायतीला मिळाले.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२१ (पडताळणी वर्ष २०१९-२०) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांना तसेच मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), चंद्रपूर (ता. राहाता. जि. अहमदनगर), लोहगाव (ता. राहाता. जि. अहमदनगर), जाखोरी (ता. जि. नाशिक), गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर), नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक), येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर), मरोडा (ता. मूल, जि. चंद्रपूर), तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर), लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली), देगांव (ता. वाई, जि. सातारा), अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) या १४ ग्रामपंचायतींना जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद गटात महाराष्ट्रातील सातारा जिल्हा परिषदेला तर पंचायत समिती गटात गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या पंचायत समित्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये, गडहिंग्लज व राहाता पंचायत समितीला प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार आहेत. तर १४ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात मिळणार आहे.
नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार २०२१ हा राज्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस १० लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल. ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार २०२१ हा पुरस्कार लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल. बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार २०२१ साठी सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदीया) या ग्रामपंचायतीची निवड झाली. या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही यंदाच्या वर्षी हे पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने विविध योजना, उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी अंमलबजावणी करुन आदर्श कामगिरी करावी, असे आवाहनही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोविड संकटात ग्रामपंचायतीने स्वत:चे कोविड केअर सेंटर सुरु केले. तेथे विनामुल्य उपचारांसह गावात औषधांचे वाटप केले. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी स्वतंत्र इमारत व विद्यार्थ्यांसाठी वाहनांची व्यवस्था. ग्रामपंचायतीची संगणक प्रयोगशाळेत एमएसआयटीचे विनामुल्य शिक्षण. अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्र्न सोडवून प्रत्येक घरात बारमाही पाणी. अशी अनेक कामे ग्रामपंचायतीने केली. त्यामुळे पुरस्कार मिळाला.
यशवंत बाईत, सरपंच, अंजनवेल ग्रामपंचायत