गुरुवारपासून आरे पुल येथे स्पर्धेला सुरुवात, 16 संघात रंगणार स्पर्धा
गुहागर : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या युवक समितीच्यावतीने जय भंडारी क्रिक्रेट प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील भंडारी समाजाच्या युवकांकरीता हे क्रिडापीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दि. 1 ते 4 एप्रिल या कालावधीत आरे पुल येथील मैदानावर भव्य भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेला मोठ्या दिमाखात प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघ उतरले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर 16 संघ मालकांतर्फे संघाचे नियोजन, निवड, व्यवस्थापन करण्यात आले आहे. तालुक्यातील सुमारे 250 खेळाडू या स्पर्धा खेळणार आहेत. स्पर्धा उत्तमरितीने पार पाडण्याकरीता भंडारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ उद्या दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये
भूमी वॉरियर्स (संघ मालक : संतोष गोयथळे),
बाळू इलेव्हन (संघ मालक : धनंजय बागकर),
रवींद्र बाग इलेव्हन (संघ मालक : निलेश मनोहर मोरे),
इलेव्हन ब्रदर्स (संघ मालक : निलेश चव्हाण),
एन. एस. दी ग्रेट (संघ मालक : मनोज पाटील),
जी. एस. के. फायटर्स (संघ मालक : कार्तिक कळझुणकर, हमरेश कळझुणकर)
गोपाळकृष्ण वॉरिअर्स (संघ मालक : स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान),
गुहागर टायगर्स (संघ मालक राकेश साखरकर),
टी. डब्ल्यू. जे. चॅम्पियन (संघ मालक : स्वप्नील नार्वेकर)
जे. डी. शुटर्स (संघ मालक : दीपक कनगुटकर व जयदेव मोरे),
श्री समर्थ कृपा (संघ मालक : ऋषिकेश तवसाळकर),
एस. डी. इलेव्हन बाग (संघ मालक : दीपक शिरधनकर, श्रीधर बागकर),
अविनाश इलेव्हन (संघ मालक : सचिन जाधव),
श्रीराम डेव्हलपरर्स (संघ मालक : दशरथ भोसले,
समर्थ कन्स्ट्रक्शन (संघ मालक : उमेश भोसले),
कल्पवृक्ष इलेव्हन (संघ मालक : निलेश सुर्वे)
या संघांचा सहभाग आहे.
विजेत्या संघास रोख रक्कम 55 हजार 555/- व चषक, उपविजेत्या 33 हजार 333/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील मालिक वीरास एलईडी टिव्ही, उत्कृष्ट फलंदाजास क्रिकेट साहित्य, गोलंदाज व क्षेत्ररक्षकास स्मार्ट वॉच देऊन गौरविले जाणार आहे.