जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे परिपत्रक प्रसिध्द
जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) 10 मार्च ला जाहीर केलेले आदेश खालीलप्रमाणे आहेत.
- सर्व मंदिर विश्र्वस्त व पालखीधारक यांनी कोरोनाची टेस्ट (Corona Test) करुन घ्यावी.
- पालखीला रुपये लावणे, सजविणे ही कामे मोजक्या लोकांच्या उपस्थितच मंदिर विश्र्वस्त, व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांनी करावीत.
- शिमगोत्सवात पालखी (Palakhi) भेटीचे कार्यक्रम परंपरेनुसार अनेक गावात होतात. या पालखी भेट सोहळ्याला पालखी नेताना जास्तीत जास्त 25 मानकरी, गावकरी यांनी उपस्थित रहावे. पालखी भेटीसाठी पालख्यांची मिरवणूक न काढता शक्यतो पालखी वाहनातून न्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा सोहळ्याला 50 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत. याची दक्षता मंदिर विश्र्वस्थ, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी व ग्रामकृती दल यांनी घ्यावी. तसेच पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारित करुन देण्यात याव्यात.
- होळी आणि पालखी पुजेचे वेळी पेढे, हार, नारळ अशा गोष्टी स्विकारु नयेत. तसेच प्रसादाचे वाटपही करु नये. नवस ही स्विकारु नयेत.
- सहाणेवर पालखी व होळीचे (Holi) दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा. किंवा सदर कालावधीत ३-३ तास नेमून द्यावेत. जेणेकरुन एकाच वेळी गर्दी होणार नाही.
- उपस्थितांनी सामाजिक अंतर (Social Distance) ठेवणे बंधनकारक राहील.
- उपस्थितांनी मास्क (Mask) परिधान करणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.
- दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे थर्मल स्क्रिनिंग (Thermal Screening) करणे बंधनकारक आहे.
- उपस्थित सर्वांनी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
- सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी (दरवाजे, हँडल आदी) वारंवार निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
- खोकताना, शिंकताना टिश्यू पेपर, हातरुमाल किंवा हाताच्या कोपराने नाव व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे व वापरलेला टिश्यू पेपरची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
- पालखी असलेल्या परिसरात थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. याचे उल्लंघन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.
- पालखी घरोघरी नेण्यात येवू नये.
- पालखी गर्दीमध्ये नाचविता येणार नाही.
- होळी हा पारंपरिक सण आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्या होळ्या आणून मोजक्या लोकांच्या उपस्थित परंपरेनुसार होम करावा.
- गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम करुन नयेत.
- प्रथेपुरते खेळ्यांचे कार्यक्रम 25 ते 50 व्यक्तिंच्या उपस्थितत करावेत.
- धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याचे टाळावे.
- छोट्या छोट्या ओळखीच्या समुहामध्ये शक्यतो रंग खेळावेत. मोठ्या व अनोळखी समुहामध्ये रंग खेळू नयेत.
- मुंबईतील ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे. होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुव व वेबसाईट आदी माध्यमांद्वारे उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन गावी न येणाऱ्या चाकरमानी यांना होळीचा कार्यक्रम पहाणे शक्य होईल. मुंबई, पुणे किंवा अन्य भागातून प्रतिबंधित क्षेत्रामधुन रत्नागिरी जिल्ह्यात होळीच्या सणाकरीता येणाऱ्या नागरिकांकडे 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लोकांना एसपीओ2 टेस्टींग, थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील. त्याकरीता नागरी किंवा ग्राम कृती दलांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत. या स्क्रिनिंग सेंटर बाबत फ्लेक्स द्वारे जनजागृती करावी.
- स्क्रिनिंग सेंटरवर नागरीकांमध्ये सर्दी खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवावे. त्याचप्रमाणे सर्दी खोकल्या सारखी लक्षणे असलेल्या कोणत्याही नागरिकास शिमगोत्सवात सामील होता येणार नाही. असा कोणीही नागरिक शिमगोत्सवात सामील होणार नाही. याची दक्षता नागरी व ग्रामकृती दलांनी घ्यावी.
- ग्रामकृती दल व नागरी कृती दल यांनी 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास आणि कोरोना शिरकाव मोठ्या प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल.
याव्यतिरिक्त प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे कोटेकारपणे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असा आदेश 10 मार्च 2021 रोजी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी निर्गमित केला आहे.