डॉ. विनय नातू; मतदारसंघात खोट्या भूमिपूजनांना पेव फुटले आहे
गुहागर ता. 28 : 2009 पासून २ वेळा भाजप – सेना मत विभाजनामुळे आणि 1 वेळा युतीमुळे ज्यांचा विजय झाला त्यांचा फार विचार करण्याची गरज नाही. फार पुर्वीपासून आपले मतदारसंघातील प्रत्येक बुथवर अस्तित्व आहे वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात कार्यकर्त्यांनी ते टिकून ठेवले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये हे अस्तित्व प्रभावीपणे सिध्द करण्याची वेळ आली आहे. असे प्रतिपादन भाजपचे गुहागर विधानसभा निवडणुक प्रमुख, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले. ते शृंगारतळी येथे पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. Guhagar taluka BJP executive announced
शृंगारतळी येथे गुहागर तालुका भाजप कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नातू म्हणाले की, धार्मिक स्थळी शिवराळ भाषा बोलणाऱ्यांना, गुहागर तालुक्यात जो विकास झाला तो मीच केला असा तोरा मिरविणाऱ्यांना दुर्लक्षितच केले पाहिजे. तसेच देवघरचे क्रीडा संकुल बंद का आहे. पर्यटनदृष्ट्या विकसीत होणाऱ्या गुहागरची गती कोणी थांबवली. याचा विचार जनतेने केला पाहिजे. गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम करण्याचा नवा पायंडा आला आहे. याचा फटका संबंधित अधिकाऱ्यांना जोरदार बसणार आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावरची अनाधिकृतपणे राजकीय बळाचा वापर करत बांधलेली जेटी जरी काढली गेली असली तरी या जेटीसाठी झालेला अनधिकृत खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसुल केला जाणार आहे. त्यावेळी या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील. Guhagar taluka BJP executive announced
केंद्रात मोदींजे तर राज्यात शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील महायुतीचे सरकार आहे. अशावेळी गुहागर तालुक्यामध्ये मात्र खोट्या भुमिपुजनांचा सपाटा लागला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांनाही सामील करून घेतले जात आहे. खोट्या पाट्या लावल्या जात आहेत. ज्यांचा या कामाशी काडीमात्र संबंध नाही अशा मर्जीतल्या लोकांची नावे या भूमिपूजनाच्या, उद्घाटनाच्या पाटीवर लावली जात आहेत. याचा सुद्धा लेखाजोगा लवकरच मांडणार असल्याचे डॉक्टर नातू यांनी सांगितले. Guhagar taluka BJP executive announced
यावेळी जिल्ह्याचे सरचिटणीस बावाशेठ भालेकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष नागेश धाडवे, लक्ष्मण शिगवण, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, गुहागर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती दीप्ती अजगोलकर, माजी पंचायत समिती सदस्य धनश्री मांजरेकर, अरुण रहाटे, विजय भुवड, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्यासह भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Guhagar taluka BJP executive announced