भाजपाच्या तालुका कार्यकारीणीत 50 जणांचा समावेश
गुहागर, ता. 28 : तालुक्याची जम्बो कार्यकारीणी 26 नोव्हेंबरला शृंगारतळीत जाहीर करण्यात आली. या कार्यकारीणीवर नजर टाकली तर आगामी निवडणुक वर्षांसाठी संघटनात्मक बांधणी मजबुत करण्यासाठी तालुक्याच्या भौगोलिक स्तराचा विचार करुन, सर्व समाजांचा समावेश या कार्यकारीणीत करण्यात आला आहे. Organizational building for upcoming election years
गुहागर तालुक्याची नवी कार्यकारीणी पुढीलप्रमाणे आहे. नीलेश सुर्वे तालुकाध्यक्ष, रघुनाथ घाणेकर पालपेणे, संदिप साळवी खोडदे, विजय मिशाळ अंजनवेल, मंगेश रांगळे पोमेंडी, श्रध्दा घाडे गुहागर, मुबिन ठाकूर जानवळे हे 6 उपाध्यक्ष आहेत. संतोष मावळंकर हे कोषाध्यक्ष रहातील. सचिन ओक कोतळूक, रविंद्र अवेरे आंबेरे हे 2 सरचिटणीस तर दिनेश बागकर यांच्याकडे सोशल मिडिया सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या कार्यकारीणी सदस्यांमध्ये रुपेश विचारे पोमेंडी, नितीन कनगुटकर पालशेत, संदिप कोंडविलकर जानवळे, दत्तराज पाटील पालशेत, उमेश भोसले गुहागर, विनायक सुर्वे पडवे, उदेश शिरधनकर तवसाळ, अनंत मोरे खोदडे, विनायक लांजेकर मुंढर, गणेश तांबे जानवळे, महेश तोडणकर पालशेत, संदिप ठाकूर वेळणेश्र्वर, दिलीप गोखले वेळणेश्र्वर, धनंजय विकास पाटील साखरीआगर, प्रकाश पवार उमराठ, प्रकाश मोरे पिंपर, विपुल नार्वेकर अडूर, दिनेश देवाळे अडूर, धनश्री मांजरेकर कौंढर काळसूर, दिपाली मोरे बाग, डॉ. संदिप जाधव देवघर, युवराज कोळंबेकर परचुरी, रामचंद्र डाफळे डाफळेवाडी, रमेश बारगोडे विसापूर, जान्हवी विखारे जानवळे, इक्बाल पंछी वेलदूर, सलीम मस्तान सुरळ, मिलिंद टक्के शीर, दिपक मोरे वेळंब, आशिष विचारे वरवेली, मुनीष जैतपाल शृंगारतळी, राजकुमार वराडकर शृंगारतळी, कृष्णा पारदळे पालकोट, नरेंद्र वराडकर गुहागर, मृणाल गोयथळे गुहागर यांचा समावेश आहे. Organizational building for upcoming election years
गुहागर तालुका अल्पसंख्यांक मोर्चा संयोजक म्हणून पांगारीचे आसिफ दळवी, ओबीसी सेल संयोजक म्हणून आरेगावचे साईनाथ कळझुणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून पालशेतचे हरिष वेल्हाळ, किसान मोर्चा सेल संयोजक म्हणून कोतळूकचे सुनिल भेकरे, पंचायत राज व ग्रामविकास सेल म्हणून मासूचे विजय मसुरकर, तालुका क्रिडा संयोजक म्हणून सुरळचे धनंजय बागकर, गुहागर शहर अध्यक्ष म्हणून गुहागरचे नरेश पवार, गुहागर शहर युवामोर्चा अध्यक्ष म्हणून गुहागरचे मंदार पालशेतकर, शृंगारतळी शहर अध्यक्ष म्हणून रुपेश भोसले, बुध्दजीवी सेल संयोजक म्हणून समीर घाणेकर, जेष्ठ कार्यकर्ता म्हणून सुरेश चौघुले,आयुष्यमान भारत सेल संयोजक म्हणून निता मालप व शिक्षक आघाडी विश्नास बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली. Organizational building for upcoming election years