• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाशिवरात्रीला श्री देव व्याडेश्र्वरांचे दर्शन घेता येणार

by Manoj Bavdhankar
March 10, 2021
in Old News
16 0
0
श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान

श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्याडेश्र्वर देवस्थान : कोरोनाची त्रिसुत्री बंधनकारक

गुहागर, ता. 10 :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर (Vyadeshwar) देवस्थानमध्ये होणारा उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. मात्र महाशिवरात्रीचे (Mahashivratra) दिवशी भक्तांना सामाजिक अंतर (Social Distance), मास्क (Mask) आणि सॅनिटायझर (sanitizer) ही कोरोनाची त्रिसुत्री पाळून व्याडेश्र्वर महाराजांचे दर्शन घेता येईल. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे यांनी दिली आहे.
दरवर्षी श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानचा महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असते. संगीत, भजन, किर्तन, नाटक, लोककला यासोबत समाजाला संदेश देणारे कार्यक्रम यानिमित्ताने व्याडेश्र्वर देवस्थान आयोजीत करत असते. गेल्यावर्षी पर्यटन उद्योगाला चालना मिळावी म्हणून व्याडेश्र्वर देवस्थानने व्याडेश्र्वर महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पुन्हा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीच्या उत्सवावर अनेक बंधने आली आहेत.
याबद्दल माहिती देताना देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे म्हणाले की, यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम (cultural activity) होणार नाहीत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये रात्री निघणारी श्रींची पालखी मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व्यक्तिगत पुजाही होणार नाहीत. असे असले तरी महाशिवरात्र असल्याने देवस्थानतर्फे षोडशोपचारी पूजा, रुद्राभिषक हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या प्राकारात दर्शनासाठी रांगेत उभे रहावे लागले. तोंडावर मास्क असलेल्या भक्तांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. सामाजिक अंतराचे भान ठेवून भक्तांना रांगेत उभे रहावे लागेल.  सॅनिटायझरने हात धुतल्यानंतरच भक्तांना सभागृहात प्रवेश मिळेल. दर्शन घेतल्यानंतर भक्तांना मंदिरात थांबता येणार नाही. असे नियम आखून आम्ही सर्व भक्तांना श्री व्याडेश्र्वर महाराजांचे दर्शन घेण्यास परवानगी दिली आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahashivratriMarathi NewsMaskNews in GuhagarNews in MarathiSanitizerSocial DistanceVyadeshwarVyadeshwar Mandirटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यामहाशिवरात्रीमास्कलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युजव्याडेश्र्वरसॅनिटायझर
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.