• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बालभारती पब्लिक स्कूलमध्ये कला प्रदर्शन संपन्न

by Ganesh Dhanawade
November 5, 2023
in Guhagar
70 1
0
बालभारती पब्लिक स्कूलमध्ये कला प्रदर्शन संपन्न
138
SHARES
393
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांमधून सादर केल्या कलाकृती

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये कला प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थीमच्या आधारे आपल्या कौशल्यांमधून कलाकृती तयार केल्या. फुलपाखराचे पंख सोडून कला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. Art Exhibition at Balbharti Public School

यावेळी एनटीपीसीचे डीजीएम श्री. शैजु एम आर व गुहागर तहसिलदार श्रीम.प्रतिभा वराळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे व कौशल्याचे शब्द सुमनानी कौतुक केले. या कला प्रदर्शानात प्री- स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झाडांपासून मिळणाऱ्या वस्तूंपासून कलाकृती, प्री- प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्था यावर कलाकृती १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कोलाजकेले, ३ रीच्या विद्यार्थ्यांनी कार्ड बोर्ड हाउस, ४ थीच्या विद्यार्थ्यांनी वाﬞल हﬞन्गिंग, ५ वीच्या विद्यार्थ्यांनी पॉट पेंटिंग, ६ वीच्या विद्यार्थ्यांनी पेपर स्ट्रो व वाﬞल हﬞन्गिंग बनविले. ७ वीच्या विद्यार्थ्यांनी कप मेकिंग व बॉटल डेकोरेशन व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी टी–शर्ट पेंटिंग व मंडल आर्ट पेंटिंग तयार केले आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांनी डूडल आर्ट व थ्रीडी शेप्स मधून कलाकृती तयार केल्या. Art Exhibition at Balbharti Public School

या कला प्रदर्शनासाठी एनटीपीसीचे एमआर डीजीएम श्री. शैजु, आरजीपीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापिका श्रीम. गुंजन शर्मा, केएलएलचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. सेल्वागनपती, श्री. कुमार स्वामी बत्तुला, एल अﬞन्ड टी प्रोजेक्टचे डायरेक्टर श्री.रत्नस्वामी, युपीएलचे साईट इन्चार्ज श्री. नितीन खानविलकर, तहसिलदार श्रीम. प्रतिभा वराळे, गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पालक संघ उपाध्यक्ष श्री. इंद्रमणी राव, पालक प्रतिनिधी सौ. रुची संसारे, असिस्टंट सेक्रेटरी श्रीम. शिखा शिन्घ,सीआयएसएफचे डीसी श्री. पौल के वियेपिये, श्री. रमेश चौरासिया, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री.मंगेश गोरीवले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, कला शिक्षक श्री. राहुल हेगिष्टे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. Art Exhibition at Balbharti Public School

Tags: Art Exhibition at Balbharti Public SchoolGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet35
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.