संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील आबलोली श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री दुर्गा देवीच्या नवरात्रौत्सवानिमित्त नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी तर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या असून स्पर्धकांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या होत्या. Fancy dress competition held at Abaloli
यामध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक आलेल्या प्रदिप पांचाळ यांनी श्री स्वामी समर्थ लक्ष्मी देवीची (स्त्री रुपात) वेशभूषा साकारली होती. व्दितिय क्रमांक वैभव नेटके यांनी भारत देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची वेशभूषा साकारली होती तर सौ.कल्याणी नेटके यांनी एकविरा आईची वेशभुषा साकारून तृतीय क्रमांक प्राप्त केला. पांजुर्ली देवीची वेशभूषा साकारलेल्या कैलास आग्रे यानां उत्तेजणार्थ क्रमांक देण्यात आला. Fancy dress competition held at Abaloli


तसेच लहान गटात प्रथम क्रमांक आलेल्या साई नेटके याने शंकराची वेशभूषा साकारली होती. तर व्दितीय क्रमांक माझी वसुंधरा हि वेशभूषा साकारलेला राजवीर बाईत तर कु.समर्थ दिंडे याने अंतराळवीर आणि कु. रुही वारे हिने विठ्ठलाची वेशभूषा साकारली होती त्यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. या स्पर्धा मंडळाचे अध्यक्ष श्री.कृष्णकांत रेपाळ, उपाध्यक्ष श्री.रविंद्र रेपाळ, सचिव श्री.अजित रेपाळ, खजिनदार श्री.प्रशांत नेटके यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा पहाण्यासाठी आबलोली पंचक्रोशीतील जनता बहूसंख्येने उपस्थित होती. Fancy dress competition held at Abaloli


फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी मंडळाचे सदस्य श्री.नरेश निमूणकर, प्रथमेश निमूणकर, नितेश (उर्फ भैय्या) निमूणकर, अक्षय निमूणकर, पिंटू निमूणकर, विशाल नेटके, वैभव नेटके, आतिष रेपाळ, योगेश रेपाळ, स्वप्नील रेपाळ, सागर रेपाळ, ऋषीकेश बाईत, सत्यम गुरसळे, धनराज गुरसळे, सुरज दींडे, शैलेश दींडे, विशाल लोकरे, शरद उकार्डे, सुरज रेडेकर, शरद लांडे, राजेश तोडकरी, गणेश महाडिक, प्रसाद नेटके, नकुल भंडारी यांनी प्रयत्न केले या फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे प्रशिक्षणाचे काम महेंद्र रेडेकर, संदेश सावंत यांनी केले तर संपूर्ण स्पर्धांचे शिस्तबद्ध सुत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री.अजित रेपाळ यांनी केले. Fancy dress competition held at Abaloli

