पूल कोसळल्याची केंद्रस्तरावरून दखल व पाहणी
गुहागर, ता. 21: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख नाका येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम करणारी मूळ ठेकेदार कंपनी तसेच पोटठेकेदार कंपनीला देखील शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच येत्या दोन दिवसात केंद्रीय समितीदेखील चिपळूणमध्ये येणार असून पाहाणी करणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल दुर्घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली आहे. Notice from central level that Chiplun flyover has collapsed
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/Advt-Rajan-Dali-17-Oct-to-16-Nov-2023.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/Advt-Rajan-Dali-17-Oct-to-16-Nov-2023.jpg)
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय असा सुमारे 1.83 कि.मी. चा उड्डाणपूल उभारला जात आहे. पुलाच्या पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे साहजिकच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या. लोकांनी देखील यासंदर्भात जोरदार आवाज उठवल्याने राजकीय व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यकर्ते तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीदेखील याबाबत दखल घेतली. आता शासनाने थेट दखल घेतली आहे. Notice from central level that Chiplun flyover has collapsed
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/add.jpg1_.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/add.jpg1_.jpg)
या उड्डाणपुलाचा मूळ ठेका एका ठेकेदाराकडे, तर पोटठेका दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आला आहे. आता शासनाने दोघांनाही कोंडीत पकडले आहे. मूळ ठेकेदार तसेच पोटठेकेदारालादेखील पूल कोसळल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले असल्याचीदेखील माहिती मिळत आहे. कारणे दाखवा नोटीस मिळताच ठेकेदार कंपनीचे धाबेच दणाणले आहेत.पाहाणीनंतर समिती आपला अहवाल केंद्राला सादर करेल. त्यानंतर केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडूनदेखील कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनानेदेखील आता चिपळूणच्या उड्डाणपुलाची दखल घेतल्याने लवकरच याबाबत सत्य उघड होण्याची शक्यता आहे. Notice from central level that Chiplun flyover has collapsed