• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मिशन बंधारे मोहिम ही लोक चळवळ व्हावी

by Manoj Bavdhankar
October 21, 2023
in Guhagar
167 2
0
Mission Bandhare campaign
328
SHARES
938
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

किर्तीकिरण पुजार; ग्रा. आरे-वाकी- पिंपळवट येथे वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

गुहागर, ता. 21: मिशन बंधारे मोहिम ही रत्नागिरी जिल्ह्यात एक लोकचळवळ व्हावी, असे मत  जि.प.रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केले. आरे-वाकी- पिंपळवट गृप ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळवट नळपाणी पुरवठा योजनेजवळील नदीवर वनराई बंधारा बांधण्याच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वतः  किर्तीकिरण पुजार यांनी उपस्थित राहून  ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समितीच्या कृषी विभागाचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. Mission Bandhare campaign

Mission Bandhare campaign

यावर्षी पावसाळ्यात पावसात पडलेला खंड व पुढील कालावधीत होणा-या स॔भाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी  जि.प.रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी मागच्याच आठवड्यात    जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने ‘मिशन बंधारे 2023-24’  मोहीमेची घोषणा केली होती. त्यानूसार महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत  या मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती गुहागर व आरे-वाकी- पिंपळवट गृप ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळवट नळपाणी पुरवठा योजनेजवळील नदीवर वनराई बंधारा बांधण्याच्या शुभारंभ करण्यात आला. Mission Bandhare campaign

यावेळी  पंचायत समिती गुहागरचे  गट विकास अधिकारी टी.बी.जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद  केळस्कर, सरपंच समित घाणेकर, पं.स.चे माजी सभापती  व कृषी उत्पन्न बाजार समिती  जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सावंत, उपअभियंता ए.पी.आचार्य, श्री. घुगे,कनिष्ठ अभियंता वैभव चौधरी, शाखा अभियंता आर. पी. ढगे, गट शिक्षणाधिकारी लिना भागवत, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी  सर्जेराव कांबळे, गजेंद्र पौनीकर, उपसरपंच विठ्ठल धावडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश सावंत, माजी सरपंच सिद्धी सुर्वे, प्रभाकर धावडे, नरेश धावडे, पॅनल तांत्रिक अधिकारी, नयना जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नेहा धातकर, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, मंडळ कृषी अधिकारी श्री.चोथे,भक्ती यादव,  ग्रामपंचायत सदस्य  समीर पारदळे, दिपाली काजारे, दिपक वानरकर, साक्षी गोवळकर, वैदेही काताळे, ग्राम विकास अधिकारी रूनाली मोरे, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आरती कळझुनकर, राजश्री साळवी, बचत गटाच्या सी.आर.पी.सुचित्रा भोसले, पोलीस पाटील विनय पागडे, मुख्याध्यापक शिक्षक वृंद, पिंपळवाडी अध्यक्ष प्रभाकर धावडे, समतानगर वाडीप्रमुख सुरेश मोहिते, कृषी सहाय्यक अनिता जाधव, वाडीपमुख सुरेश पागडे, पांडुरंग सोलकर, अनुष्का धावडे, वैभव देवकर, ग्रामपंचायत कर्मचारी समीर पागडे, शिवशंकर बुगडी, केतकी भोसले, स्वप्नाली बागकर कल्पेश पवार इ .सर्व उपस्थित होते. Mission Bandhare campaign

Mission Bandhare campaign

तसेच तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच, पत्रकार बंधू, गावातील ग्रामस्थ, प्रमुख मंडळी, ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, बचत गट महिला,  तालुक्यातील विभागांतर्गत अधिकारी कर्मचारी  तसेच ग्रामपंचायत आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ग्रामविकास ग्रामसेवक संघटना, सरपंच संघटना तसेच कार्यालयीन कर्मचारी संघटना यांनी खूप मोलाचा सहकार्य केले. Mission Bandhare campaign

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMission Bandhare campaignNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.