• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाविकास आघाडीला उमेदवार शोधावे लागतील

by Mayuresh Patnakar
October 19, 2023
in Guhagar
172 2
2
Chandrasekhar Bawankule visit to Guhagar

शृंगारतळी : जनसंवाद सभेनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे

338
SHARES
966
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चंद्रशेखर बावनकुळे, विरोधकांच्या टिकेला जनताच उत्तर देईल

गुहागर, ता. 19 : जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ते गुहागर मतदारसंघात महाविजय संकल्प 2024 या उपक्रमांतगर्त संपर्क ते समर्थन अभियानासाठी शृंगारतळी येथे आले होते. Chandrasekhar Bawankule  visit to Guhagar

शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा कधीही विचार नव्हता असे सांगताना शरद पवार यांनी यशवंतरावांचा दाखला दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, अजितदादा, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी वारंवार सांगितले आहे की,  2014, 2019 आणि 2023 मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांनीच घेतला होता. त्यामुळे एखाद्या व्यक्तिमत्त्वाने या वयात किती खोटे बोलावे  याचा विचार करावा. 11 पक्षांची आमची महायुती लोकसभेच्या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे. राज्यातील 45 जागांवर आमचा विजय निश्चित आहे. शरद पवार यांच्यासह आयएनडीआयए च्या सर्व उमेदवारांचा पराभव होईल. हे जनतेनेच ठरविले आहे. रायगड लोकसभा  मतदारसंघात आज मी 2300 हून अधिक मतदारांना भेटलो, 5 हजार पक्षप्रवेश झाले. वडापाव विक्रेता, केळी विक्रेता, पानवाला, शेतकरी, महिला या सर्वांचे समर्थन भाजपला कसे मिळते आहे हे तुम्ही देखील आजच्या संपर्क यात्रेत आपण पाहिले असेल. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. Chandrasekhar Bawankule  visit to Guhagar

पंतप्रधान मोदी सातत्याने मुंबईत येतात. ते प्रधानमंत्र्यांऐवजी प्रचार प्रमुख झालेत अशी टिका विरोधक करत आहेत. यावर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले त्या प्रत्येकवेळी त्यांनी भरघोस निधी दिला. हा निधी राज्याच्या विकासासाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळेच जनतेने मोदीजींचे अभिनंदन केले आहे. यावर काही बोलता येत नाही म्हणून विरोधक टिका करतात. आज जगाने मोदींचे नेतृत्त्व मान्य केले आहे. 14 देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना दिला आहे. जगातील 78 टक्के देशांनी मोदींजींना सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री म्हटले आहे. अशा व्यक्तीवर गुहागरचे आमदार टिका करतात. याचे उत्तर गुहागरमधील जनताच ऑक्टोबर 2024 मध्ये मतपेटीतून दिल्याशिवाय रहाणार नाही. Chandrasekhar Bawankule  visit to Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share135SendTweet85
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.