रविवार दि.२२ रोजी कुडली येथे धम्म संस्कार,आदरांजली
गुहागर, ता. 18 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा मुंबई मध्यवर्ती कमीटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर – मुंबई या राजकीय पक्षाचे व धम्म संघटनेचे माजी अध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय, धम्म व शैक्षणिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, बाबासाहेबांचे निष्ठावान अनुयायी दिवंगत श्री.शिवराम पांडुरंग जाधव यांचे व्दितीय सुपूत्र श्री.महेंद्र शिवराम जाधव यांचे सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे दु:खद निधन झाले. त्यांचे वय ५७ वर्षे होते. Mahendra Jadhav of Kudli is no more

दिवंगत महेंद्र जाधव हे आपल्या वडिलांचा सामाजिक, धार्मीक, राजकीय वारसा पुढे चालवीत होते. कोरोना काळात त्यांनी वाडीतील अनेक रुग्णांना रत्नागिरी व गुहागर येथे उपचारासाठी नेले आहे. त्यांचा प्रेमळ, शांत व हसमुख स्वभाव ऐॆन तारुण्यात काळाने हिरावून घेतल्याने कुडली पंचक्रोशीत तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत श्री.महेंद्र शिवराम जाधव यांची धम्म संस्कार आदरांजली सभा (शोकसभा) रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता कुडली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे त्यांच्या रहात्या घरी आयोजित करण्यात आली आहे. तरी गुहागर तालुक्यातील बौद्ध बंधू – भगीनींनी सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. Mahendra Jadhav of Kudli is no more
